Type Here to Get Search Results !

जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने "श्रावण मासा " निमित्त व्याख्यान


सोलापूर : जागतिक लिंगायत महासभा (सोलापूर शाखा) च्या वतीने "श्रावण मास" निमित्त सुप्रसिध्द व्याख्याते प्रा. डॉ. भिमराव पाटील (लातूर ) यांचे 'शरण हरळय्या व कल्याणक्रांती' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

हे व्याख्यान रविवारी, २७ ऑगस्ट २०२३ रोजी सायं. ७.०० वाजता सोलापूर विमानतळाजवळील हत्तुरे वस्ती येथील हरळय्या नगर, कुमठा कॉर्नर येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजयकुमार हत्तुरे यांनी संयोजन समितीच्या वतीने केले आहे.