संगीतामुळे जीवनाला नवी उमेद व ऊर्जा : डॉ. शिवरत्न शेटे

shivrajya patra


 राज फाउंडेशनतर्फे 09 जणांचा 'नवरत्न' ने सन्मान

सोलापूर : संगीत म्हणजे मनाला आनंद देणारी सुंदर कला आहे. दुःख विसरून जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा देते. संगीताच्या सुरांनी मन, मेंदू आणि शरीर प्रफुल्लित होते. आयुर्वेदाने देखील व्यक्तीच्या आरोग्यासाठी संगीताचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असं प्रतिपादन शिव-बसव चरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.


राज फाउंडेशनच्या वतीने नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल संरक्षण अधिकारी जोएल मेकेन्झी, पोलीस उपाधीक्षक (लातूर) चंद्रकांत माळी, साहित्यिक (पुणे) अनिल पाटील, जिल्हा सरकारी वकील अॅड. आंनद कुर्डुकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राज फौंडेशनचे अध्यक्ष अतुल स्वामी उपस्थित होते.


यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल 09 गुणीजनांचा सन्मान राज फौंडेशनकडून शनिवारी, हुतात्मा स्मृति मंदिरात करण्यात आला. प्रास्ताविक राज फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल स्वामी यांनी केले सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले. 



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपाली महामुनी, राज स्वामी, सुधा सरगुले, वैष्णवी स्वामी, अश्विनी कांबळे, आम्रपाली लोखंडे, मोहद्दिन कोरबू, रोहित स्वामी यांनी परिश्रम घेतले.


यावेळी धनश्री सरगुले, भक्ती महामुनी, चैत्राली शिरसागर, अनुराधा गंगुल, विद्या जठार, राहुल कौलगुड, अशोक बिराजदार, भागवत जठार, विनायक सरगुले, भूषणकुमार स्वामी, सनी भंडारे, दीपक वडीशेरला, शब्बीर बंडी, फारुक शेख, मल्लिकार्जुन सर यांच्या सुरेल आवाजातून मराठी व हिंदी गीतांचा 'ए कहां आ गये हम' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

.... चौकट ...

... यांचा झाला सन्मान ! 

पोलिस निरीक्षक अरविंद माने (पोलिस सेवा), डॉ. निलरोहित पैके (वैद्यकीय सेवा), विजय साळुंखे (सांस्कृतिक), अशोक किल्लेदार (नाट्य), एजाज हसन शेख (संघटना), राजगंधर्व सदाफुले, अनुराधा गांगल, एजाज शेख (गायन), डॉ. संजय मुरूमकर (शैक्षणिक)


फोटो ओळी : राज फाउंडेशनतर्फे नवरत्न पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. शिवरत्न शेटे, जोएल मेकेंजी, चंद्रकांत माळी, ऍड. आनंद कुर्डूकर, अनिल पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, अतुल स्वामी यांच्या समवेत पुरस्कार प्राप्त मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.

To Top