सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल संस्थापक आमदार ओमप्रकाश उपाख्य बच्चू कडू संस्थापित प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, कासेगांव शाखेच्या वतीने गुरुवारी, जिल्हाध्यक्ष विजय पुरी, शाखाध्यक्ष राजकुमार वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. जमदाडे यांचं अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी शाखा उपाध्यक्ष गणेश माने, सचिवा करुणा जाधव, खजिनदार सुखदेव गायकवाड आणि शाखा संपर्कप्रमुख इक्बाल शेख सदस्य तुकाराम सुरवसे, शेषराव चव्हाण, सोहेल शेख, हुजपा तांबोळी, मिरा जाधव, संध्या जाधव, ज्ञानेश्वरी अवताडे यांच्याबरोबर महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अल्लाऊद्दीन शेख, राजू गायकवाड हेही उपस्थित होते.
यावेळी शासकीय योजना आणि लाभापासून वंचित असलेल्या दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी जिल्हाध्यक्ष विजय पुरी यांनी डॉ. किरण जमदाडे यांना अवगत केले. त्यावर डॉ. जमदाडे उर्वरितांचे त्या-त्या योजनांचे अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयाकडे जमा करण्याचं आवाहन डॉ. जमदाडे यांनी उपस्थितांना केले.
*****
... चौकट
प्रहार दिव्यांग क्रांती पदाधिकाऱ्यांनी घेतली सभागृह नेते नरेंद्र काळे यांची भेट
त्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, कासेगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांची भेट घेतली. या भेटीत शहरी दिव्यांगाप्रमाणे ग्रामीण भागातील दिव्यांग बंधू-भगिनींना सिटी बस प्रवासासाठी 'सवलत पास' मिळण्यासंबंधीचं निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शाखाध्यक्ष राजकुमार वाडकर, उपाध्यक्ष गणेश माने, सचिवा करुणा जाधव, खजिनदार सुखदेव गायकवाड आणि तुकाराम सुरवसे, शेषराव चव्हाण, सोहेल शेख, हुजपा तांबोळी, मिरा जाधव, संध्या जाधव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.



