मोटार सायकली चोराच्या आवळल्या मुसक्या; 2, 10, 000 रूपये किंमतीच्या 03 मोटारसायकली जप्त

shivrajya patra

फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या D. B. पथकाची कामगिरी


सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतून मोटार सायकली चोरी करणाऱ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळून, त्यानं चोरी केलेल्या 2, 10, 000 रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 03 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. रोहन सुभाष बालनकर (वय- 26 वर्षे, एन. जी. मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर.) असं या आरोपीत चोरट्याचं नाव असल्याचं सांगण्यात आलंय.


फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी तिघे आले. त्यांनी त्यांच्या तीन मोटारसायकली चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. त्यामध्ये तानाजी रविमोहन पसुल, यांची एच.एफ. डिलक्स MH13/ DD4037 ही मोटारसाकल 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सरस्वती चौकातील अॅटलान्स शोरूम समोरून चोरीस गेली होती.


तानाजी शिवाजी चव्हाण असं दुसऱ्या फिर्यादीचं नांव असून त्याची हिरो होंडा कंपनीची सी. डी. डिलक्स  एम.एच.13/ DA 9247 ही मोटारसाकल त्याच दिवशी सायंकाळी सरस्वती चौकातील नितीन बीर्याणी दुकानासमोरुन चोरीस गेली होती. म. युसुफ इब्राहीम चौधरी असं तिसऱ्या फिर्यादीचं नाव आहे. त्यांची बजाज कंपनीची डिस्कवर मोटार सायकल एम.एच.13/ AD 9187 ही मोटारसाकल 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी अॅटलान्स शोरुम दुकानासमोरुनच चोरीस गेली होती.


या तिन्ही तक्रारीचं निरीक्षण करता, त्या तिन्ही मोटासायकली एकाच दिवशी जवळपासच्या ठिकाणावरुन चोरीस गेल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकामधील सपोनि क्षिरसागर आणि त्यांच्या पथकानं तात्काळ तपास सुरु केला.


घटनास्थळचे सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक माहिती संकलित करुन त्या आधारे गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन सर्व गुन्ह्यातील संशयित चोरट्याचा शोध घेत असताना तिन्ही मोटारसायकली या एकाच इसमानं चोरी केल्याचं निष्पन्न झालं होतं. 


गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन मोटार सायकल चोरणारा आरोपी रोहन सुभाष बालनकर हा चोरीच्या गुन्ह्यातील मोटार सायकलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास जुनी मिल कंपाऊंडमधील 

कडबा मैदानात अत्यंत शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करून त्याच्या ताब्यातुन 03 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी दुचाकी चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्यापासून अवघ्या 08 तासाच्या आत आरोपीस पकडून तिन्ही गुन्हे उघडकीस आणले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या 02, 10, 000 रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 03 मोटार सायकली हस्तगत केल्या. 

--- चौकट 

... यांची कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१) अरूण देवकर, वपोनि महादेव राऊत, दुपोनि विकास देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/विनायक काळे, पोह/महेश शिंदे, पोह/बसवराज परीट, पोकॉ सुधाकर माने, पोकॉ/ सुहास गायकवाड, पोकॉ/अजय चव्हाण, पोकॉ/विनायक जाधव, पोकॉ/सुरज सोनवलकर, पोकॉ/पंकज घाडगे, पोकॉ/कृष्णा बडुरे, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ/शशिकांत दराडे आणि पोकॉ/ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पार पाडली.

*****

--- चौकट 

रिक्षात विसरलेल्या पर्सचा तात्काळ तपास; दागिणा मिळाल्यानं मानलं पोलिसांचं आभार

शुक्रवारी, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.30 वाजण्याच्या च्या सुमारास रिक्षामध्ये प्रवास करीत असलेली प्रवाशी महिला सरोजा सुनिल टिकाबरे (राहणार- मु.पो. मुस्ती, ता-दक्षिण सोलापूर) हिच्या रिक्षामध्ये विसरलेले अर्धा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा तात्काळ शोध घेऊन प्रवाशी महिलेस परत मिळवून दिले. 

सरोजा कुंभार वेशीतून एका रिक्षामध्ये बसून नव्या पेठेतील काळे हॉस्पीटलमध्ये आली होती. रिक्षातून उतरतांना तिचे सोन्याचे दागिने असलेली पर्स रिक्षामध्ये विसरल्याचे काही वेळाने लक्षात आल्यावर तिने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले होते.

तिला रिक्षाचा नंबर तसेच इतर काहीही वर्णन आठवत नव्हते. तिच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/विनायक जाधव यांनी सी.सी.टी.व्ही कॅमेरे व तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षाचा शोध घेऊन सदर महिलेचे अर्धा तोळ्याचे दागिने असलेली पर्स त्या महिलेस सुखरुप परत मिळवून दिली. तिने फौजदार चावडी पोलीसांचे मनापासून आभार मानले.

To Top