दसूर : दसूर विकास सोसायटीच्या वतीने संस्थेच्या सभासदांना 10 टक्के डिव्हिडंड (लाभांश) वाटपाचा कार्यक्रम नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार तज्ञ जयसिंह मोहिते-पाटील तसेच विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे चेअरमन धनंजय वासुदेव सावंत पाटील यांच्या हस्ते सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते वसुदेव आप्पा यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सभासदांना 10 टक्के लाभांशाचे धनादेश व रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे संचालक मंडळ, सचिव तसेच गावातील प्रतिष्ठित सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या पारदर्शक, विश्वासार्ह आणि प्रगतीशील कारभारामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चेअरमन धनंजय वासुदेव सावंत पाटील आणि संचालक मंडळाचे सभासदांनी अभिनंदन केले.



