हारून बंदूकवाला यांचं निधन

shivrajya patra


सोलापूर :  येथील कॅम्प उर्दू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक हारून बंदूकवाला यांचं मंगळवारी दुपारी 03 वाजता आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात दुःखाची लाट पसरली आहे. ते मृत्यूसमयी 59 वर्षीय होते.


मरहूम हारून बंदूकवाला हे अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ, सुस्वभावी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ते अखिल भारतीय उर्दू अदबी कॉन्फरन्ससह विविध सामाजिक संस्थांशी संलग्न होते. 


आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राने एक सच्चा व मनमिळाऊ व्यक्ती गमावली आहे.


त्यांच्या पत्नी सोलापूर येथील सोशल उर्दू स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

To Top