शालेय मैदानी स्पर्धेत कुमठे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी !

shivrajya patra

विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर


कुमठे : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कुमठे येथील खेळाडूंनी शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केलं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केलं आहे.


या स्पर्धेत विभा लालसिंग जाधव हिने तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. संजना रमेश कोळी हिने 03 किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. सुरेखा दशरथ बाळगंडे हिनेही 03 किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच  अरमान अशपाक शेख याने 05 किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.


तमन्ना रशीद शेख हिने भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. अक्षरा अश्विन पवार हिने 4 × 400 मीटर रिले क्रॉस कंट्री  स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. साक्षी शिवानंद जाधव हिने 800 मीटर धावण्यात तृतिय क्रमांक क्रॉस कंट्री तृतीय, तर 4 × 400 मीटर रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. तसेच यश लक्ष्मण साळुंखे याने 1500 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.



या सर्व यशस्वी खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. या यशामागे क्रीडा शिक्षक संजय घोडके व दीपक शिंदे यांचं मोलाचे मार्गदर्शन व विशेष परिश्रम लाभलं आहे. त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली.


या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, संस्थेचे मुख्य विश्वस्त तथा नगरसेवक जयकुमार माने, संस्थेच्या विश्वस्त प्रा. स्वाती माने, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रेडे, क्षीरसागर सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. संजय जाधव यांनी सर्व यशस्वी खेळाडूंबरोबर मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कुमठे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

To Top