सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर अभिवादन सभा पार पडली.
या सभेमध्ये महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड, अक्कलकोट तालुका अध्यक्ष गंगाधर शिवचरण, दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष राम गायकवाड, प्रा. अभिजीत भंडारे, जयदीप गायकवाड (अक्कलकोट), गुंडीराम साठे ( मंगळवेढा), सागर चंदनशिवे (मंगळवेढा), इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी इंनुस बाळगी, प्रमोद जाधव, अमोल जाधव, अशोक ठाकर, किशोर पठाडे (करमाळा), इरफान शेख, प्रा. विकास काटकर, रत्नदीप कांबळे, मुकुंद चंदनशिवे, नीलकंठ अय्यर, युवराज वाघमोडे, रोहन गायकवाड, बाळासाहेब माने, प्रिया कदम, कु. पृथ्वी शिंदे, वशिष्ठ सोनकांबळे, प्रा. सयाजी घाडगे (सांगोला) इत्यादी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक इन्नुस बालगी यांनी केले. सूत्रसंचालन महीबुब तांबोळी यांनी केले तर गंगाधर शिवशरण यांनी सर्वांचं आभार मानले.


