कुमठे : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, कुमठे येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात भर घातली आहे. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
या स्पर्धेत
✨ सर्वज्ञा परशुराम चव्हाण (गोळाफेक) द्वितीय क्रमांक,
✨ आदर्श नितीन सपकाळे आणि अनुज नितीन सपकाळे (05 कि. मी. चालण्याची स्पर्धा) द्वितीय क्रमांक,
✨ विनायक अनिल माने (उंच उडी) प्रथम क्रमांक,
✨ आरोही मिथुन राठोड (उंच उडी) तृतिय क्रमांक
आणि
✨ कार्तिक खासदार जाधव (उंच उडी) यानं तृतीय क्रमांक मिळवला. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, संस्थेचे मुख्य विश्वस्त तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक जयकुमार माने, संस्थेच्या विश्वस्त स्वाती माने, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार आणि शाळेचे समन्वयक मलकरी कोरे, कुमठे प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास रेडे, कुमठे जुनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख संजय जाधव यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा शिक्षक विक्रम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांमधील क्रीडा-गुणांना वाव देण्यासाठी शाळेकडून सातत्याने प्रोत्साहन दिलं जात आहे.
या यशामुळे लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, कुमठेच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

