पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापुरात महाविकास आघाडीचा महामेळावा

shivrajya patra

जयंत पाटील, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती


सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाविकास आघाडीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.


या महामेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



याशिवाय महसूल विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान व माजी आमदार, खासदार तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.


पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्यासाठी तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या अनुषंगाने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


या मेळाव्यास जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले आहे.

****
To Top