पुरोगामी विचारसरणीतून हा पुरस्कार सोहळा झाला, याचा मला खूपच आनंद : रणजीतसिंह डिसले गुरुजी

shivrajya patra


शिक्षकांना शिकवू द्या...! शासनास हाथ जोडून विनंती : अय्युब अहमद 

अन्नदान सेवा सोसायटीचे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान


सोलापूर : अन्नदान सोसायटीचं कार्य प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा पुरोगामी विचारसरणीतून होत आहे, मला याचा खूप आनंद होतोय, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचं ग्लोबल अवार्ड विनर शिक्षक डिसले गुरुजी यांनी केले.


अन्नदान सेवा सोसायटीतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात  जागतिक कीर्तीचे डिसले गुरुजी यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. उर्दू-मराठी ज्येष्ठ साहित्यिक अय्युब अहमद नल्लामंदू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी रणजीतसिंह डिसले गुरुजी बोलत होते.


याप्रसंगी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण, ट्वेंटी-ट्वेंटी शुगर लातूरचे व्हाईस चेअरमन समीर भागवत सलगर , प्रा. पी. पी. कुलकर्णी, सखुबाई हिराचंद नेमचंदच्या मुख्यध्यापिका नीता येरमाळकर, दिलीप माने सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सैफन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.


येथील शिवस्मारक ऑडिटोरियम मध्ये आयोजित सोहळ्यात सुरूवातीला क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.


प्रास्ताविकेत संस्थेचे डॉ. जैनोदीन पटेल यांनी  संस्थेचा उदिष्ट स्पष्ट करत शिक्षकांचा सन्मान आजची गरज असल्याचे सांगितले. डॉ. वाहेद जमादार, इरफान लालकोट,  डॉ. हारुन बागबान, डॉ. आसीफ इक्बाल यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करत त्याचा सत्कार केला. त्यानंतर कवियत्री शाहीन सदफ यांनी सावित्री फुले यांच्या कार्यावर कविता सादर केली.

 

त्यानंतर मुख्याध्यापिका अश्विनी मोहन चव्हाण, मुख्याध्यापिका नीता श्रीपाद येरमाळकर, पी. पी. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कारप्राप्त शिक्षकांचं अभिनंदन केले.


यावेळी बोलताना रणजीतसिंह डिसले गुरुजी पुढं म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञाचा आज सर्रास वापर होत असतना तुम्ही मुलासाठी नेमके काय करता, तो शिकतो का?' याच्याकडं लक्ष देऊन आपुलकीने धडे द्या. शिक्षकांनी पालकांशी सुसंवाद साधत त्यांना स्मार्ट पद्धतीने शिकविणे सुरु करा, ते करत-करत, चुकत-चुकत नक्कीच शिकेल. यावेळी त्यांनी जपान आणि अन्य देशातील शिक्षण पध्दतीतील तंत्रज्ञानाचे किस्से सांगत मागदर्शन केले.


आयोजक फातीमाबीच्या नांवाने सुद्धा हा पुरस्कार देऊ शकले असते, परंतु तुम्ही ज्ञान-दानाचा सन्मान केला. ही अभिमानास्पद बाब आहे, असंही शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर सोलापूरचे नांव गाजविणारे डिसले गुरुजी यांनी शेवटी म्हटले.



शिक्षकी पेशा सर्वात पवित्र पेशा हे सर्वज्ञात आहे, परंतु आजपर्यंत त्याला पाहिजे, तसा सन्मान मिळाला नाही. आम्ही प्रत्येक वर्षी शिक्षक दिनानिमित त्यांचा सत्कार करून कार्य मुक्त होत असतो. मात्र त्यांच्या समस्या, प्रशासकीय अडचणींकडे मात्र लक्ष दिलं जात नाही, याची खंत ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.


आज शिक्षकांना बीएलओपासून ते कोणत्याही कामाची जबाबदारी सोपविली जाते. तरी ते सर्वच जबाबदाऱ्या स्विकारत प्रशासनाचा साथ देत असतात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मी या मंचाद्वारे शासनास हाथ जोडून विनंती करतो कि, शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या. बालकांचं भविष्य घडवू द्या !, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.



ते पुढे म्हणाले, चांगल्या होतकरू शिक्षकांमुळे नवीन पिढी घडत आहे. त्यांच्यामुळेच समाज सुसंस्कृत होत आहे. हे आपल्याला विसरता येत नाही,असा शिक्षकांप्रती कृतार्थ भावही त्यांनी यावेळी व्यक्त  केला. कार्यक्रमाचं सुरेख सुत्र संचालन डॉ ए. ए. विजापुरे यांनी केले तर डॉ. वाहेद जमादार यांनी आभार मानले.

***** 

यांचा झाला सन्मान .....

✨ आदर्श शाळा सोशल उर्दू हायस्कूल घरकुल, 

✨ आदर्श मुख्याध्यापक डॉ.हारून बागबान, डॉ आसिफ इक्बाल , मसर्रत बिजापुरे, तसेच " आदर्श शिक्षक" म्हणून शाफिया कौसर शौकत अली शेख, शबाना शाहभाई, फरहान नल्लामंदू, तहसीन कोतकुंडे,  शाहीन शकील नल्लामंदू, आफ्रिन पटेल, तनवीर अ. मन्नान बिजापुरे, आर्शिया होटगी, शाहीन शेख, रिजवाना प्यारे, शमशाद शामलिक, फौजिया शेख, असरार अबुबकर नल्लामंदू, नसीमा शेख, बासित बागलकोटे, इरफान बानकरी, आसीया कौसर बिजापुरे, मुशिरा पानगल, फरहाना पठान,  फौजिया बागबान, सयाम सय्यद, अनिसा शेख, उमर फारूक बिद्री, बीबी आयेशा मनियार, राहत डोणगांवकर, नजमा चांदा, आस्मा पठाण, निलोफर शेख, माजीद बडेघर, बिबी शबनम नदाफ, रिजवाना बेलीफ, आरेफा शेख, तस्किन माजीद चांदा, हिना कौसर देशमुख, आलिया परवीन शेख, फिरोजा जमादार, विकारूनिस्सा कोटी, इमरान काझी, हमिदा बागवान, इसाक बाटगर, परविन सय्यद, सबिहा मुजावर, रियाज सय्यद, बदरुनिसा दफेदार यांना स्मृतिचिन्ह, शाल-बुके देऊन गौरविण्यात आले.

To Top