जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल व विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

shivrajya patra

उत्तर सोलापूर : सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय कुस्ती, कराटे व योगासन स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल व विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील 10 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.


तालुकास्तरीय कुस्ती, कराटे व योगासन स्पर्धा कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या मैदानावर नुकत्याच पार पडल्या.

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी

योगासन (17 वर्षे मुले) - 

आविष्कार प्रसेनजीत काटे (प्रथम), 

धनराज रमेश साठे (तृतीय)

योगासन (19 वर्षे मुले) - 

शंभुराजे नागेश जाधव (प्रथम), 

राजवीर विठ्ठल भोसले (द्वितीय),

प्रवीण देवीदास जाधव (तृतीय)

योगासन (मुली) - 

संध्या ज्योतिबा रणदिवे (प्रथम), 

अक्षरा दिनकर साठे (तृतीय)

कराटे (14 वर्षे, 30 किलो मुली) -

स्वरा विरेश शिनगारे (प्रथम) - जिल्हास्तरीय निवड

कुस्ती (17 वर्षे मुले - ग्रेको रोमन) - 

जीशान जावेद शेख (68 किलो - प्रथम), गुरुराज कृष्णात भोसले (80 किलो - प्रथम)

कुस्ती (19 वर्षे मुले) - 

ओमराज क्षिरसागर (63 किलो - प्रथम)

कुस्ती (19 वर्षे मुली) -

कार्तिकी नागनाथ दळवे (52 किलो - प्रथम), प्राजक्ता रमेश निंबाळकर (55 किलो - प्रथम), आकांक्षा अनिल शिंदे (63 किलो - प्रथम) तसेच कबड्डी स्पर्धेत (19 वर्षे मुली) महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश निळ म्हणाले, "यशाच्या मार्गावर अनेक जण असतात, पण यश मिळवणारे कमी असतात. आमच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."

"पक्षाला भरारीसाठी पंख लागतात, तसं विद्यार्थ्यांना भरारीसाठी शिक्षक रूपी पंख लागतात. सर्वांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा." असं प्राचार्य सुषमा निळ यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले.


क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचं या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना औरादे, रवी कोतकुंडे, प्रतीक्षा खुणे आदी शिक्षक उपस्थित होते.

To Top