सोलापूर : येथील ज्येष्ठ उर्दू साहित्यिक कवी, लेखक, निवृत शिक्षक बशीर अ. कदीर दौलताबाद उर्फ "बशीर परवाज़" यांचं निधन झाले. ते मृत्यूसमयी ८२ वर्षीय होते. शुक्रवारच्या नमाजनंतर जडेसाब कबस्तान येथे दफन (सुपूर्द-ए-खाक) करण्यात आले.
मरहुम बशीर परवाज़ हे बज्मे गालीबचे अध्यक्ष, कुल हिंद उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि 'उर्दू मेला' चे संपादक म्हणून त्यांनी उर्दू भाषेची खूप परिश्रम घेत सेवा केली.
2015 च्या आसपास जिल्हा मराठी पत्रकार संघा तर्फे देण्यात आलेल्या " उर्दू साहित्य सेवा पुरस्कार' राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रदान करून स्व. बशीर परवाज़ यांना गौरविण्यात आलं होतं .
त्यांच्या निधनानं उर्दू साहित्याचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं असल्याची खंत उर्दू-मराठी साहित्यीकांनी व्यक्त केली. बशीर परवाज यांच्या निधनानं उर्दू भाषा साहित्यासाठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं.
त्यांच्या पश्चात 02 भावंडं, पत्नी, 02 मुले-मुली, नातवंडे असा परिवार आहे. निवृत शाखा अभियंता व उर्दू चे ज्येष्ठ कवी मीर अफज़ल यांचे ते मोठे भाऊ होते.


