सोलापूर : सोलापूर Crime पत्रकार संघाच्या सन 2026- 27 वर्षासाठी अध्यक्षपदी दैनिक 'नवराष्ट्र' चे विशाल भांगे यांची तर रवी मस्के आणि परशुराम कोकणे यांची अनुक्रमे खजिनदार आणि सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृहामध्ये शुक्रवारी दुपारी पत्रकार विनायक होटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत यंदाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
प्रारंभी आप्पासाहेब पाटील (दैनिक लोकमत) यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भरतकुमार मोरे (दैनिक पुण्यनगरी), पांडुरंग सुरवसे (दैनिक कटूसत्य) यांच्यासह अनेकांनी आपली मनोगतं व्यक्त केली. Crime पत्रकारांच्या एकजुटीसाठी आणि विविध उपक्रमाचे आयोजन पुढील काळात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. यानंतर नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला सागर सुरवसे, आफताब शेख, अभिषेक आदेप्पा, विक्रांत कालेकर, गौसपाक पटेल, अनिकेत गायकवाड, राहुल रणदिवे, संतोष कासे, रवि ढोबळे, राजकुमार पवार, चंदन बोल्लू, सौरभ वाघमारे, जागृत रणदिवे, अकबर बागवान, नागेश चिप्पा आणि फय्याज शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
... कार्यकारिणीत यांचा आहे समावेश !
उपाध्यक्ष विजयकुमार बाबर, इरफान शेख, विश्वभूषण लिमये, योगेश तुरेराव, कार्याध्यक्ष अश्विनी तडवळकर, अप्पासाहेब पाटील, सहसचिव शहानवाज शेख, इब्राहिम मुजावर, सहखजिनदार लक्ष्मीकांत शिंदे, दिनेश शिंदे, प्रसिध्दीप्रमुख तौसिफ शेख, प्रमोद तुपसमुद्रे, यासिन शेख तर सुर्यकांत आसबे, शिवाजी सुरवसे, विनायक होटकर, उमाकांत चौडे, भरतकुमार मोरे, वैभव गंगणे, दिगंबर इप्पलपल्ली, इम्रान सगरी, विनोद कामतकर, रोहन नंदाणे कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.
अविनाश कुलकर्णी, राजकुमार नरूटे, भगवान परळीकर, संजय येऊलकर, पांडुरंग सुरवसे सल्लागार असतील, तर अॅड. प्रदीपसिंह रजपूत, अॅड. संतोष न्हावकर यांची विधी सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
