प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प' नेतून रक्तदान शिबिर; महापौर कोंड्याल यांच्या हस्ते उद्घाटन

shivrajya patra

जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन

सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्पनेतून’ सुनील नगर येथील जय भवानी मित्र मंडळ संचलित श्री वरदविनायक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढाकार घेतलेल्या नागरिकांचे त्यांनी अभिनंदनही केले. तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना महापौरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा उपक्रम राबविले जात असताना, त्याच भावनेतून जय भवानी मित्र मंडळ संचलित श्री वरदविनायक मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


'रक्तदान हे श्रेष्ठदान' असून, एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला मदत होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेत सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी करण्यात आले.



गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत मंडळाच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने ‘सेवा संकल्पनेतून’ दीप उत्सव' उपक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी आवश्यक दिव्यांचे वाटप महापौर कोंड्याल यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आले.


‘दीप उत्सव’ साजरा करताना सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरानंतर होणाऱ्या या दीपोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.


रक्तदान शिबिर आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून ‘सेवा हीच खरी साधना’ हा संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न असून, नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.


या कार्यक्रमास राजू चलमेटी, रमेश चक्राल, नरेश कोंतम, राकेश चक्राल, प्रवीण बोड्डू, श्रीनिवास जल्ला, अंबादास पोलू, विद्यासागर श्रीराम, नरेश येरवा, विनायक गड्डम, सुरेश नल्ला यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते, रक्तदाते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top