विशालनगरचा गणेशोत्सव म्हणजे समाजसेवोत्सव
सोलापूर : जुळे सोलापूर येथील विशालनगर गणेशोत्सव मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत. लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करण्याकडे मंडळाचा प्रारंभापासूनच कल राहिला आहे.
मिरवणुकीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
गेल्या 15 वर्षापासून गणेशोत्सवातील डॉल्बी, मिरवणूक व इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत मंडळाने ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य दिले जाते. आजपर्यंत लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिले. यंदाही सुमारे ₹ 60 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी
शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच वृक्षारोपणाचा उपक्रम सातत्याने राबविला जातो. लॉकडाऊनच्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 52 झाडांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली.
पक्षी व प्राण्यांसाठी जलकुंभ
कडक उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी जलकुंभ ठेवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पक्ष्यांसाठी झाडांवर छोटे जलपात्र तर प्राण्यांसाठी मोठे जलकुंभ ठेवण्यात आले.
सामाजिक कार्याची अखंड वाटचाल
रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांतून मंडळाने ‘उत्सवाचा आनंद समाजाच्या उपयोगी यावा’ हा विचार प्रत्यक्षात आणला आहे.
विशालनगर गणेशोत्सव मंडळ
उत्सव भक्तीचा… संकल्प समाजसेवेचा!
सेवा • शिक्षण • पर्यावरण • सामाजिक बांधिलकी
अंकुर येळीकर - खजिनदार
विशाल नगर गणेशोत्सव मंडळ, जुळे सोलापूर.

