सोलापूर : जैन गुरुकुल प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरची विद्यार्थिनी ज्योती कृष्णदेव खंडागळे हिची सोलापूर जिल्ह्यातून पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्योती खंडागळे ही जैन गुरुकुल प्रशालेची हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी म्हणून सर्व परिचीत आहे.
महाराष्ट्र शासन यांच्यावतीने सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत तिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थिनीला प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुभाष उपासे, संजय पंडित आणि प्रसन्न काटकर यांचं मार्गदर्शन लाभले.
तिच्या यशाबद्दल श्री ए. प. दि .जैन पाठशाळेचे सचिव डॉ. रणजीत गांधी, विश्वस्त पराग शहा, भूषण शहा तसेच प्रशालेचे प्राचार्य राजकुमार काळे, उपप्राचार्य शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, इत्यादी मान्यवरांनी तिचं अभिनंदन केले. ज्योती खंडागळे ही समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची नात आहे.

