प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगांव शाखेचं गुरूवारी सकाळी उद्घाटन

shivrajya patra

 

सोलापूर : '।। जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधू ओळस्वाचा देव तेथेचि जाणावा ।।' या ब्रिदावर कार्यरत असलेल्या संस्थापक आमदार ओमप्रकाश (बच्चूभाऊ) कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कासेगांव येथील शाखेचा गुरूवारी, 01 ऑक्टोबर रोजी सकाळी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शाखा उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा महिला अध्यक्षा सौ. संजीवनी बारंगुळे, जिल्हा अध्यक्ष विजय पुरी आणि तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन शाखा अध्यक्ष राजकुमार वाडकर, शाखा उपाध्यक्ष गणेश माने, शाखा सचिव करुणा जाधव, शाखा खजिनदार सुखदेव गायकवाड आणि शाखा संपर्क प्रमुख इक्बाल शेख यांनी केलं आहे.

***

To Top