नूर सोशल वेल्फेअर ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थांना स्कॉलरशीपचे धनादेश वाटप

shivrajya patra

सोलापूर :  स्व. नजीर मुन्शी स्थापित नूर सोशल वेल्फेयर ट्रस्ट तर्फे उमर खलीफा सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक तथा नजीर मुंशी तौसिफी कमेटीचे अध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू , अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. हजरत शेख, सचिव उम्मीद सय्यद यांच्या प्रमुख उपस्थित अकरा गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 9.5 लाखाची शिष्यवृतीचे धनादेश वाटप करण्यात आले. 

नूर ट्रस्टचे नूतन अध्यक्ष नूर नज़ीर मुन्शी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर सचिव महेमूद नवाज जहागीरदार यांनी प्रास्ताविकेत नूतन कार्यकारी मंडळाची ओळख, ट्रस्टची आणि शिष्यवृतीची सविस्तर माहिती दिली. रफीक खान, डॉ. जैनोद्दीन पटेल यांनी प्रमुख पाहुण्यांचे बुके देऊन स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते नासीर खलीफा कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी डॉ. साजीद हुंडेकरी यांनी उच्च शिक्षणा साठी मिळणारे इतर विविध शिष्यवृतीची तांत्रिक माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे अय्यूब अहमद, नसीर खलीफा, शफी कैप्टन यांनी विद्यार्थांचे मार्गदर्शन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा  दिल्या.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. म. शफी चोबदार , खजीनदार बिलाल मुगद, सदस्य रफीक खान, डॉ. जे. एन. पटेल, मुनाफ शेख, इक्बाल बागबान, इम्राम जमादार, केंद्र प्रमुख सुहेल नाईक, अख्तर शेख आणि खलील बाणकरी उपस्थित होते.


कार्यक्रमाचं सुत्रसंचालन महेमूद नवाज यांनी केले तर डॉ. पटेल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

To Top