सोलापूर : शेळगी येथील बनशंकरी नगरमधील रहिवासी संगप्पा चन्नप्पा बुरकुले यांचं वृध्दापकाळात अल्पशः आजारानं निधन झाले. ते मृत्यूसमयी 85 वर्षीय होते.
रविवारी सकाळी 11.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांचे ते वडील होत.
