अन्य गुन्ह्यात 02 किलो गांजा-दुचाकी हस्तगत
सोलापूर : पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील 04 तपास पथकांनी लक्षवेधी कामगिरीत 05 गुन्हे उघडकीस आणून 16,09,100 रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये 02 किलो गांजा आणि मोटार सायकल असा 01, 90, 000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल असलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे व अंमली पदार्थाविरूध्द कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स.पो.नि.निलेश पाटील-सोनवणे व पथक, स.पो.नि.शैलेश खेडकर व पथक, स.पो.नि.शंकर धायगुडे व पथक आणि पो.उप. नि. विजय बनसुडे आणि पथक यांनी केलेली कामगिरी उल्लेखनिय आहे.
10 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेकडील स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे व त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या खबरीनुसार पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण कडील अभिलेखावरील घरफोडी आणि मोटार सायकल चोरीतील आरोपी यश ऊर्फ सोन्या ज्ञानेश्वर खलसे (वय-22 वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. पाणी फिल्टर जवळ, नाशिक फाटा, लवासा सिटी पिंपरी पुणे. सध्या रा. अप्पर बस डेपो, पवन नगर, गल्ली नं-2, पुणे) हा सोलापूर शहरामध्ये येणार आहे. त्यानुसार स.पो.नि.निलेश पाटील-सोनवणे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपी यश उर्फ सोन्या खलसे यास शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कौशल्यपूर्ण सखोल तपास करून घरफोडीचे 02 गुन्हे (जेलरोड पो. स्टेशन गुन्ह्यातील 81 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि 01 युनिकॉर्न मोटार सायकल चोरीचा गुन्हा (सासवड पो.स्टे. पुणे ग्रामीण) 03 गुन्हे घडकीस आणले. त्यात 12, 89,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
तत्पूर्वी 01सप्टेंबर रोजी रात्री 11.25 वा. सुमारास अशोक चौक नजिक पायी जात असलेल्या पादचाऱ्याची मोटार सायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून जबरी चोरी केली. त्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखेकडील स. पो. नि. शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळ आणि त्या परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी करून संशयिताचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले.
त्यानंतर पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि उमेश पवार यांनी सलग 08 दिवस घटनास्थळापाHन सुमारे 200 कि.मी. पर्यंत अंतरावरच्या सुमारे 168 सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची पडताळणी केली. त्यामध्ये पथकाने प्राप्त केलेल्या माहितीवरून आरोपी संघर्ष उत्तम वाघमारे (वय-22 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. मु.पो. काठोडा, जिल्हा बीड) यास परभणी येथून 09 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केली.
त्यानंतर अटकेतील आरोपी संघर्ष वाघमारे याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने त्याचा आतेभाऊ साथीदार नामे रोहन तुकाराम थोरात (रा.मु.पो. काठोडा, जिल्हा बीड) याच्यासह 01सप्टेंबर रोजी रात्री अशोक चौक परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या पादचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार त्या गुन्ह्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन व 05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गणपती पेंडलसह आणि गुन्हा करण्याकरिता वापरलेले साहित्य असा 2, 75, 000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
10 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेकडील पो. उप. नि. विजय बनसुडे व व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात हद्दीमधील गस्त करीत असताना नवीवेस पोलीस चौकी ते रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर जुनी मिल चाळजवळ ओंकार टी हाऊस चहाचे टपरी शेजारी सोलापूर सायंकाळच्या सुमारास दोन इसम त्यांच्याकडील अॅक्सेस स्कूटीवर संशयास्पद स्थितीत वेगाने जात असल्याचे दिसून आले. म्हणून त्यांनी त्या इसमांचा पाठलाग करून त्यापैकी एका इसमास शिताफीने पकडले तर एक इसम गल्ली बोळाचा फायदा घेऊन पळून गेला.
चौकशीमध्ये पकडलेल्या इसमाचं नाव शिवाजी धनु राठोड (वय- 60 वर्षे रा. गणपत तांडा, बक्षी हिप्परगा.) असल्याचे आढळले. तो त्याचा साथीदार संतोष राम चव्हाण (रा. मुळेगांव तांडा, सोलापूर) याच्यासह गांजा विक्री करण्यासाठी आल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची अॅक्सेस स्कूटी क्रमांक MH-13 FE 1473 च्या हँडेलजवळ एक कापडी पिशवीमध्ये गांजा सदृश्य पदार्थ असल्याचे आढळले.
त्यानंतर फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करून रासायनिक तपासणी केली असता, तो पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कायदेशिर कारवाईमध्ये नमूद गांजाचे वजन 2 किलो 011 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. तो गांजा तसेच नमूद स्कूटी कायदेशिर पंचनामा करून जप्त करण्यात आली. यासंबंधी ताब्यात घेतलेला आरोपी शिवाजी धनु राठोड आणि पळून गेलेला आरोपी संतोष राम चव्हाण यांच्याविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट 8(क), 20(ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
16 जानेवारी 2025 रोजी दुपारच्या सुमारास एक महिला त्यांच्या किराणा दुकानासमोर असताना मोटार सायकलवर आलेल्या 02 अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन सोन्याच्या वाट्या चोरी करण्यात ते यशस्वी झाले. याबाबत बझार पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.क. 309(6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये गुन्हे शाखेकडील स. पो. नि. शंकर धायगुडे व तपास पथक यांनी सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटविली. परंतु ते आरोपी अजय संजय पंडीत, (वय- 21, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर आणि राहुल माणिक आमराव (वय- 30, रा. अशोक नगर, ता. श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर) हे सतत ठावठिकाणा बदलत असल्याने ते मिळून येत नव्हते.
या पथकाने सातत्याने आरोपींच्या ठाव-ठिकाणांचा मागोवा घेऊन त्यांना 10 सप्टेंबर रोजी पकडले. त्या गुन्ह्यातील जबरी चोरी केलेल्या मंगळसूत्रातील 45, 000 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या हस्तगत केल्या. हे दोन्ही आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांचा गुन्हेगारी अभिलेख सोबत जोडला आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि.शंकर धायगुडे यांच्या पथकाने घरफोडी चोरीचे 02, जबरी चोरीचे 02 मोटार सायकल चोरीचा 01 असे गुन्हे उघडकीस आणून 16, 09, 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच पो.उप.नि. विजय बनसुडे व त्यांच्या पथकाने अंमली पदार्थ कायद्यान्वये कारवाई करून 02 किलो गांजा आणि मोटार सायकल असा 01, 90, 000 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
-----
... यांनी पार पाडली कामगिरी !
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि.शंकर धायगुडे, पो.उप.नि.विजय बनसुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अभिजित पवार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, वसिम शेख, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अजिंक्य माने, अभिजित धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबर पो. स्टे. कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, आशिष राठोड, चालक बाळासाहेब काळे आणि खंडू कांबळे यांनी पार पाडली.
****


