मराठा सेवा संघ दक्षिण भारत सचिवपदी शिवश्री राम गायकवाड

shivrajya patra

तुळजापूर : मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत सचिवपदी शिवश्री राम विठ्ठल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तुळजापूर इथं मंगळवारी, ०१ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते राम गायकवाड यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सचिव सुनील महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा, तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राम विठ्ठल गायकवाड यांनी आजपर्यंत विविध पदांवर जबाबदारी सांभाळत संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान दिलं आहे. त्यांनी संघटनेच्या विचारांचा प्रचार-प्रसार, समाजाचे संघटन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

दक्षिण भारत सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाल्याने दक्षिण भारतातील मराठा सेवा संघाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी तसेच संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी गायकवाड यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिवश्री राम गायकवाड यांच्या निवडीबद्दल मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधवांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे.

*****

To Top