सोलापूर : कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग गायकवाड नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानंतर नूतन प्राचार्य म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, मुख्य विश्वस्त नगरसेवक जयकुमार माने, विश्वस्ता प्रा. स्वाति माने यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास रेडे यांना पदभार देण्यात आला.
यावेळी सर्व विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नूतन प्राचार्य अंबादास रेडे यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी नूतन प्राचार्य अंबादास रेडे यांना माजी प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. 
यावेळी त्यांनी ब्रह्मदेवदादा च्या आर्शिवादीत संस्थेत काम करण्याचा आनंद मिळाला. पुढे सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी नुतन मुख्याध्यापकांनाही सहकार्य करावं, गोरगरीब कष्टकरी मुलांची जडण-घडण करुन दादांच्या स्वप्नातील कुमठे घडवावं, असं आवाहन केले. सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने यांचा आर्शिवाद घेऊन नूतन प्राचार्य अंबादास रेडे यांनी पदभार स्विकारला. 
यावेळी माजी आमदार दिलीपराव माने, नुख्य विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाति माने यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रा. संजय जाधव, प्रा. नंदकुमार बंडगर, प्रा. संतोष जाधव, भुजंग वाघमारे, मनिषा लोंढे, उर्मिला बनसोडे, भाग्यश्री खोबरे, नितीन लावंड, शांतप्पा काळे, प्रा. हणमंत शिंदे उपस्थित होते, त्यांनी नुतन प्राचार्य रेडे यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक विजयसिंह क्षिरसागर यांनी केले तर संजय घोडके यांनी आभार मानले.
