वर्धापनदिन विशेष... मराठा सेवा संघ वैभवशाली भारतासाठी आशेचा किरण

shivrajya patra

     

       मराठा सेवा संघ

   वैभवशाली भारतासाठी आशेचा किरण

(०१ सप्टेंबर, मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीच्या वर्धापन दिन)
-------

एकीकडे जातीय धर्मांध कट्टरवादाचे जहाल विष तर दुसरीकडे पुरोगामी च्या नावावर टोकाची भूमिका यातून होणाऱ्या जातीय धार्मिक संघर्षरुपी रोगाने तीन दशकांपूर्वी भारताचं सामाजिक जीवन होरपळून निघत होतं, परंतु ०१ सप्टेंबर १९९० ला मराठा सेवा संघाची स्थापना ही या रोगावरील नव संजीवनी च्या रुपाने या देशाला वरदान ठरली. मराठा सेवा संघाच्या वैचारिक क्रांतीने जातीय धार्मिक अंधश्रद्धेच्या दंगलरुपी रोगातून देशाला दंगल मुक्त करुन प्रगतीची नवी दिशा दिली.

आधुनिक युगातील महान पुरोगामी चळवळ 'मराठा सेवा संघ' या नावाने फार विचारपूर्वक छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील अठरापगड जातीतील मावळा म्हणजे मराठा या व्यापक अर्थाने ०१ सप्टेंबर १९९० ला पुरुषोत्तम खेडेकर या धेय्यवेड्या माणसाने उच्च विद्या विभुषित लोकांना संघटीत करुन मराठा सेवा संघ या चळवळीच रोपटं लावलं, बघता-बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला, या वटवृक्षाच्या फांद्या ३३ कक्षाच्या रुपाने विस्तारल्या.

भारतीय समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विवेकी लोकांना संघटीत करुन या वटवृक्षाचा विस्तार झाला. जणू एका नव्या युगाची सुरुवात या युगपुरुषाने केली. समाजजागृतीसाठी साहित्य लेखन करुन पुरोगामी विचाराची बहुजन समाजात पेरणी केली. मराठा सेवा संघ या मातृसंघटनेच्या अधिनस्त ३३ कक्ष समाजोन्नतीचा हा गाढा जोमाने पुढे नेत आहे. त्याची थोडक्यात ओझरती ओळख करुन घेऊ या.

संभाजी ब्रिगेड

संभाजी ब्रिगेड या नावाने तरुणांच संघटन उभं करण्यात आलं. या कक्षाच्या रुपाने देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे. या देशातल्या तरुणांना समाज विघातक, धार्मिक विद्वेष, कट्टरवाद धार्मिक दहशतवादाच्या जहरीली विळख्यातून, मादक पदार्थाच्या व्यसनातून परावृत्त करुन त्यांच्या भावी आयुष्याची होणारी राखरांगोळी रोखून, तरुणांच्या जीवनात त्याच्या भविष्याची नवी सोनेरी पाहाट आणण्याचं व देशामध्ये जाती धर्मातील सलोखा व बंधुभाव राखण्याचं, महिलांच्या रक्षणाचं प्रसंशनीय कार्य संभाजी ब्रिगेड करत आहे.

०० टक्के राजकारण १०० टक्के समाजकारण हे धेय्य डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या प्रगतीच व जनतेच्या सुखशांतीच एकमेव सुत्र "शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि नशामुक्त गाव" हे ब्रिदवाक्य घेऊन वाटचाल करत आहे. जनतेने संभाजी ब्रिगेड ला राजकीय संधी अवश्य द्यावी. देशाच्या प्रगतीसाठी संभाजी ब्रिगेड ची ब्लु प्रिंट तयार आहे. 

संभाजी ब्रिगेड च्या नजरेतील भारत घडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकिय क्षितिजावर एका नव्या मंगलमय पहाटेचे स्वप्न साकारण्यास जनता-जनार्धनाच्या आशीर्वादाने सर्व शक्तीनिशी जनतेच्या सेवेस समर्पित आहे. संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला सुखी संपन्न प्रगतीशील आदर्श देश घडविण्याचे धेय्य डोळ्यासमोर ठेवले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या तमाम जनतेला सहकार्य करण्याचे आव्हान करीत आहे. संभाजी ब्रिगेड च्या नजरेतील अधोरेखीत धेय्य व उद्दिष्ट उदंड आत्मविश्वासाने जनतेसमोर घेऊन येत आहे.

शेतकरी, सर्वात प्रथम जगाच्या पोशिंद्यावर या व्यवस्थेनं गळ्यात फास घेण्याची वेळ आणलेली आहे. यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची बिनाशर्त सरसकट कर्जमाफी करुन त्याच्यावर कर्ज घ्यायची वेळच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणार यासाठी यथाशिघ्र स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करुन शेतमालाला हमीभाव देणे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यास प्रत्येक शेतासाठी पक्के रस्ते बांधणे, नदीजोड प्रकल्प राबवून बारमाही पिकांसाठी शेतात मुबलक पाणी व सिंचनाची सोय करण्यात येऊन दुष्काळावरील कायमस्वरुपी उपाय योजणे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास मोफत विज देणे. शेतकऱ्यांना यापुढे बँकांकडून कर्ज घ्यावे लागणार नाही, त्याऐवजी सरकारकडूनच हेक्टरी १ लाख रु. अनुदान देण्यात येऊन यापुढे एकही शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करणार नाही, याची  व्यवस्था करणे. भुमीहीनांना शासकीय जमिनीतून हक्काचे पक्के पट्टे देणे, आदीवासींचा त्यांच्या जल जमीन जंगलावरचा अधिकार कोणीही काढू शकणार नाही, असा कडक कायदा करणे तसेच वनहक्क कायद्यातील तिन पिढ्याची अट रद्द करुन शेतकऱ्याचा हक्क कायम करणे,

बेरोजगार, युवक युवतींना लघुउद्योगाकरीता १० लाखापर्यंत बिना जामीन बिना तारण कर्ज देण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक बेरोजगार कुटुंबाला किमान १८ हजार रुपये वेतन मिळेल अशी रोजगाराची हमी देणे, ७० टक्के च्या वर नैसर्गिक अपंगत्व असणाऱ्या सर्व बेरोजगारांना १० हजार रुपये दरमहा मदत देऊन बेरोजगारीवर १०० टक्के उपाय करुन कोणीही बेरोजगार असणार नाही. याची हमी देणे यासाठी संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे.

शिक्षण व्यवस्थेवरच देशाचं भविष्य ठरत असते. तेव्हा KG ते PG पर्यंतचे सर्व शिक्षण सक्तीचे दर्जेदार व पदवीपर्यंत मोफत तथा प्रत्येक ग्रामीण भागातील अंगणवाडी सरकारी शाळांचा काॕन्हेटच्या धर्तीवर दर्जेदार इंग्रजी माध्यमातून इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेत शिपाई क्लर्क प्रत्येक विषयासाठी प्रशिक्षित तज्ञ शिक्षकांची भरती करणे, शिक्षकांना करावी लागणारी १५० च्या वर अशैक्षणिक कामे बंद करणे, जीवनोपयोगी वैज्ञानीक दृष्टीकोनाने परीपूर्ण असलेला अभ्यासक्रम राबविण्यात येऊन जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करणे त्यासाठी आम बजेटच्या २५ टक्के शिक्षण क्षेत्रासाठी खर्च करण्यास, सर्व विद्यार्थ्याना मोफत प्रवास पास, जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत जेवण, निवासासाठी वसतीगृहाची सोय करण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध असणार. ओबीसींसह सर्व जातीची जातीनिहाय जनगनना करुन त्यांच्या प्रमाणात सरकारी नोकरीतील भागीदारी व अनुशेष भरुन काढून आरक्षण व आम बजेटमधील वाटा मिळवून देण्याची हमी. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कुणावरही अन्याय न करता मराठा समाजासाठी स्थायी आरक्षणाची तरतुद करुन मराठा समाजाला त्याचे हक्क व अधिकार मिळवून देणे. संभाजी ब्रिगेड शिवधर्माच्या महान मानवतावादी तत्वज्ञानाच्या आधारे धार्मिक तथा जातीय दंगलींचे समुळ उच्चाटन करणे व जगातील सहिष्णू वा शांतीप्रिय देश म्हणून भारताची ओळख निर्माण करणे.

 अ दर्जाच्या सर्व धार्मिक स्थळांचे सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीयकरण करण्यात येऊन त्याच्या उत्पन्नातून शिक्षण आरोग्य दारिद्रय निर्मुलन कुपोषण सारख्या लोककल्याणकारी योजना राबवून भारताला महासत्ता बनवणे. प्रत्येक गांव स्मार्ट व्हिलेज करणे, बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे सर्व सुविधायुक्त पक्के घर देणे, दिल्ली च्या धर्तीवर दर्जेदार डिजीटल शाळा, प्रत्येक गावात गावालगतची सरकार जागा खरेदी करुन सार्वजनिक उद्यान, प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय, खेळासाठी क्रीडा संकुल, २४ तास वीज, शुद्ध पिण्याचे पाणी, पक्के काॕक्रिट रस्ते, पक्की सांड-पाण्याची व्यवस्था, प्रत्येक घरी संडास, धुरविरहीत स्वयंपाकघर, महिलांच्या सक्षमिकरण व सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजणे, मुलींच्या शिक्षणासाठी व सर्वांग विकासासाठी सर्व सुविधा मोफत करणे, सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची सोय करणे, महिलांना आत्मसंरक्षणासाठी व आत्मनिर्भयतेकरीता प्रशिक्षण व अर्थसहाय्य देणे, महिला बचतगटांना लघुउद्योगासाठी अल्पव्याजदरात कर्जपुरवठा करणे, निर्व्यसनी समाज हिच देशाची खरी ताकद असते. जो निर्व्यसनी तो सुखी हे निसर्गाच सुत्र आहे. तेव्हा संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात संपूर्ण देशात दारुबंदी करण्यात येऊन दारुची कारखाने व दारु तस्करांना कायमस्वरुपी हद्दपार करावी, यासाठी संभाजी ब्रिगेड आग्रही आहे.

आयुष्याचा शेवट हा सुखकर व्हावा, यासाठी सर्व जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व वृद्धापकाळ २ हजार पेन्शन देण्यास कटीबद्ध. जातीभेद हा देशाला लागलेला कलंक आहे तो धुवून काढणे हे संभाजी ब्रिगेडचं स्वप्न आहे. या जातीभेद निर्मुलनाकरिता आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन नवदांपत्याला ५ लाख रु.मदत देणे. पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी ताडोबा सारख्या महाराष्ट्रासह देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प असलेल्या अभयारण्याला जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळे तयार करणे, आपले ऐतिहासिक धरोवर असलेले सर्व ऐतिहासिक गड किल्ले व वास्तुंचे संवर्धन करुन पर्यटनासाठी विकसित करणे सर्व  ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे.

मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील सर्व धरण नदी तलाव सागर यासारख्या जलस्त्रोतांवर स्थानिक  मच्छिमारांना मच्छिमारीचे अधिकार देणे. आरोग्याच्या प्रत्येक नागरीकाला उत्तम सोयी देणे ही सरकारची जबाबदारी असते तेव्हा "आरोग्य माझा हक्क" ही योजना तयार करुन महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक सरकारी रुग्णालयात डायलेसिस पासूनच्या सर्व सोयी मोफत पुरविणे हा प्रत्येक नागरीकाचा हक्क पूर्ण करणे,

ग्रामीण जनतेच्या सेवेत कसूर न राहावा यासाठी सर्व ग्रामीण कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयी सरकारी क्वाॕर्टर बांधून देणे, विकासाच्या तथा प्रशासनाच्या दृष्टीने छोटी राज्य, जिल्हे, व तालुके निर्मितिला प्राधान्य देणे, दुर्गापूर सारखी थर्मल पावर स्टेशन्स, एम आय डी सी, कोल माइन्स, धरणांकरीता शेतकऱ्याच्या कवडीमोल किंमतीत जमीनी आवंटीत केलेल्या आहे, परंतु त्या उपयोगात न आणता तशाच पडून असेल तर अशा जमीनीचा फेरआढावा घेऊन त्या शेतमालकाला परत करणे. खाजगीकरण म्हणजे देशाची सार्वभौमक्ता नष्ट करणे होय. तेव्हा खाजगीकरणाला पूर्णता पायबंद घालून शाळा काॕलेजेसपासून सर्व स्रोतांचे सरकारीकरण करणे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी कठोर कायद्याची निर्मिती करण्यात येवून सर्व भ्रष्टाचारांकडून देश विदेशातून काला धन सरकार जमा करुन कडक कायदेशीर कारवाई करणे. 

देशाच्या आंतरिक तथा बाह्य सुरक्षिततेशी कसलीही तडजोड करण्यात येणार नाही.तिन्ही सेनादले जगात उच्च दर्जाची सर्व सोयींनी संपन्न करणे. देशातील सर्व समाजउद्धारकांना,ऐतिहासिक मानवतावादी  कार्य करणाऱ्या सर्व महामानव संतांना भारतरत्न देवून गौरान्वित करणे. आदर्श मातृत्वाची उत्तुंग प्रेरणास्त्रोत असलेल्या राष्ट्रमाता राजमाता माॕसाहेब जिजाऊंच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे जागतीक दर्जाची सर्व सोयीसुविधायुक्त जिजाऊसृष्टी निर्माण करणे. लोकशाहीच्या रक्षणार्थ सर्व प्रशासनिक संस्था स्वयंपूर्ण करणे, पारदर्शकतेसाठी निवडणूक प्रक्रिया बॕलेटपेपरवरच घेण्यात येऊन जनतेच्या भावनेला व विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणे.
  ही सर्व १०० टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्याकरीता सर्व मोठे व्यापारी उद्योगपती यांच्याकडून होणाऱ्या करचोरीवर कडक उपाय करणे. उद्योगपतींचे डुबीत सर्व कर्ज सक्तीने वसूल करणे व पारदर्शक कारभाराची हमी देवून संभाजी ब्रिगेड जनतेला दिलेल्या वचनाची १००% पुर्तता करण्याची हमी देत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद 

व्यसनमुक्त निरोगी समाज घडवणाऱ्या समाजसेवकांचं संघटन.
युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी भारतात सुख समृद्धी शांती नांदावी, देशाचं कल्याण व्हावं, यासाठी मराठा सेवा संघाची महान पुरोगामी चळवळ उभी केली. या चळवळीला गती देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आपापल्या क्षेत्रात या चळवळीचं काम जोमाने पुढे न्यावं, या दृष्टीने ३३ कक्ष निर्माण केले. या कक्षांद्वारे देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे. त्यातला एक कक्ष "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष".
 निरोगी निर्व्यसनी सुदृढ बलशाली समाजच कोणत्याही देशाची धरोवर असते. मादक पदार्थाचे व्यसन हे मानसाला शारीरिक मानसिक व आर्थिक दुर्बल बनविते. व्यसन हेच माणसाच्या अधोगतीचे दारिद्रयाचे कारण आहे. ज्या देशाचा नागरिक दुर्बल तो देश दुर्बल.या देशाला बलशाही बणविण्यासाठी या देशाचा युवक हा निर्व्यसनी असवा यासाठी राष्ट्रसंतांनी आदर्श मानवी जीवनाच्या संहितेच ग्रामगीतेच्या रुपाने आपल्या जीवनाचं संविधानच जनू राष्ट्रसंतांनी आपल्याला उपलब्ध करुन दिलं. त्यांनी भजनांच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मार्मिक भजने लिहीली व स्वतः गाऊन समाजाला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

परंतु आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शाळकरी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू-गुटखा, बिडी-सिगारेट, दारु, चरस, भांग-गांज्या....आदी मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शासन प्रशासन वर-वर व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम राबवित असल्याचे भासवते, परंतु मुळात मादक पदार्थाचे स्रोत मात्र कायमस्वरुपी बंद करत नाही. कारण सरकारला जनतेच्या आरोग्याची नाही तर महसुलाची चिंता आहे. 

यामुळेच व्यसनाचे प्रमाण वाढत असून दारिद्रयात अनारोग्यात वाढ झाली असून देशाचं भवितव्य धोक्यात आलं आहे. आमचा विश्वास आहे की, दहा वर्ष रस्ते नाही बनले विकासाची कामे नाही झाली तरी चालेल, परंतु सरकारने ही अंमली पदार्थाची दारुची कारखाने बंद केली, या सर्व अंमली पदार्थाच्या स्त्रोतांवर कडक अंकूश बसवला तर प्रत्येक घर सुखी होईल पर्यायाने देश सुखी होईल.
  "निर्व्यसनी समाज सुखी समाज" हे राष्ट्रसंतांच अधुरं राहिलेलं स्वप्न मराठा सेवा संघ प्रणित "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसन मुक्ती कक्षाद्वारा" व्यसनमुक्ती शिबिरे, पथनाट्यासारखे कार्यक्रम आयोजीत करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच काम राष्ट्रीय स्तरावर सुरु आहे.

जिजाऊ ब्रिगेड

जिजाऊ ब्रिगेड हे एक महिलांच्या उत्थानाकरिता उभारण्यात आलेलं संघटन आहे.

 कोणत्याही समाजरुपी रथाची दोन चाके पुरुष आणि स्त्री असून, ही दोन्ही चाके सारखी गतीमान असेल तरच समाज वेगाने पुढे जाऊन प्रगती करु शकतो, हे त्रिकाल सत्य डोळ्यापुढे ठेऊन, या वर्ण-व्यवस्थी समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्रीला गुलाम करुन अनेक बंधनात बांधून ठेवले. या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त, सुदृढ व सशक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाने स्त्रियांचं संघटन "जिजाऊ ब्रिगेड" कक्ष स्थापन करुन स्त्रीयांना आपल्या गुलामगिरीची जाणीव करुन दिली. धार्मिक बंधनातून व कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाच्या माध्यमातून वैचारीक लढा उभारला आहे. स्त्रीयांवरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडून स्त्रीसक्षमिकरणाचं कार्य मोठ्या प्रमाणात या कक्षद्वारा सुरु आहे.

आपल्या प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक सिंधु संस्कृतीमध्ये स्री ही कुटुंबप्रमुख असायची, शेतीचा शोध लावणारी स्री होती, कुटुंबाचा कारभार स्रीच चालवत असे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब सुखी होते. त्यामुळेच हा देश सुखी संपन्न होता, या देशात सोन्याचा धुर निघत होता, असे म्हणतात. त्या काळात या देशाला सोन्याची चिडीयाॕ असे सुद्धा म्हणत, म्हणजेच हा देश जगात सुखी समृद्ध होता, याच कारण मातृसत्ताक समाजरचना होती. म्हणूनच माता हे बिरुद लागलेला जगातला एकमेव देश भारत हा आहे. परंतु आर्य वैदिकांच्या आक्रमणानंतर या देशात वर्णव्यवस्था निर्माण करुन स्रीला गुलाम केले गेले. अनेक बंधनात तिला बांधलं गेले, 

आज तिच्या बंधनाच्या प्रतिकाने अलंकाराची जागा घेतली, परंतु हे तिच्यावर लादलेली बंधने आहेत. स्रीला शुद्राचा दर्जा दिला गेला. तिच्यावर शिक्षणबंदी लादली गेली. तिला उपभोगाची वस्तु तथा चुल आणि मुल एवढ्यापुरतीच सिमीत करुन ती कधी स्वतंत्र होणारच नाही, यासाठी भाकड पोथीपुराणे रचून तिच्यामागे उपास-तापास कर्मकांडे लादली गेली. तिथूनच या देशाच्या अधोगतीला सुरुवात झाली.

स्री सक्षम असेल तरच समाज वेगाने पुढे जाऊन प्रगती करु शकतो. आजही ज्या घरात स्री स्वतंत्र आहे, स्रीला सन्मान आहे,स्री प्रमुख आहे, ते घर सुखी समृद्धच दिसेल. मातृसत्तेच हे त्रिकाल सत्य डोळ्यापुढे ठेऊन, या वर्णव्यवस्थी समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्री ला गुलाम करुन अनेक बंधनात बांधून ठेवले. या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त, सुदृढ व सशक्त करण्यासाठी व तिला या शोषक धर्माच्या विळख्यातून बाहेर काढून शिवसंस्कृतीतील गतवैभव शिवधर्माच्या माध्यमातून राष्ट्रमाता राजमाता माॕ. जिजाऊंना उत्तुंग मातृत्वाचं प्रेरणास्थान मानून स्रीयांना गतवैभव मिळवून दिलं. 

मातृशक्तीच या देशाला महासत्ता बनवू शकते, या विश्वासाने मराठा सेवा संघाने स्त्रियांच संघटन "जिजाऊ ब्रिगेड" कक्ष स्थापन करुन स्त्रीयांना आपल्या गुलामगिरीची जाणीव तथा धार्मीक बंधनातून व कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाच्या माध्यमातून वैचारीक लढा उभारला. स्त्रीयांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून स्त्रीसक्षमिकरणाचं कार्य मोठ्याप्रमाणात या कक्षाद्वारा सुरु आहे.

विश्वाची अर्धी शक्ती ही स्री शक्ती असून या शक्तीला जगातल्या एकाही धर्माने अग्रस्थान सन्मान दिलेला नव्हता. उलट स्री शक्तीला काही धर्मांध्यांनी वाळीत टाकले होते, परंतु मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवधर्माच्या प्रकटनाने आपल्या प्राचीन मातृसत्ताक बळी, सिंधु, शिव संस्कृतीचं पुनर्जीवन करुन विश्वातला असा एकमेव असलेला शिवधर्म की, ज्यात मातृसत्तेचं प्रतिक जिजाऊंच्या रुपाने विश्वाची जननी स्री हेच आपलं प्रेरणास्थान माणून माहिलांना सर्वाधिकार व अग्रस्थान देणारा जगातला पहिला धर्म "शिवधर्म" ठरला आहे.

आज शिवधर्मानुसार महिला आचरण करित असून त्यांनी आपल्या घरातून या शोषक पुरोहितांना हद्दपार केले आहे. प्रत्येक संस्कारामध्ये  पुरोहिताची भुमिका महिला स्वतः पार पाडत असून धार्मिक गुलामीतून स्री मुक्त झाली आहे. जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातुन घराघरात शिवधर्माच आचरण व्हाव यासाठी प्रयत्न होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (PDRSP)

समाजाला योग्य दिशा देणाऱ्या व देशाचा आधारस्तंभ असलेली सक्षम भावी पिढी घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांच संघटन.

हा कक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून या कक्षाच्या माध्यमातून, शिक्षकच खऱ्या अर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याच कार्य  करीत असतो. त्यामुळे भारताचं महासत्ता होण्याचं स्वप्न शिक्षकच पूर्ण करु शकतो, यावर मराठा सेवा संघाचा विश्वास आहे. त्यासाठी विवेकशील विज्ञानवादी पिढी तयार करणे आवश्यक आहे, तरच हे स्वप्न पूर्ण होवू शकते. हे कार्य शिक्षकाच्याच हातून घडू शकते. त्या दृष्टीने डॉ.पं. दे. रा. शि. प.कार्य करत आहे. शिक्षकांच्या केवळ भौतिक समस्या सोडविणे, एवढ्यापुरतेच मर्यादित काम या कक्षाचे नसून शासनाला शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रम निश्चितीत दिशानिर्देश देणे, देशाच्या धर्मनिरपेक्षतेला, एकात्मतेला व बंधुभावाला बाधा येईल, अशा अभ्यासक्रमातील घटकावर आक्षेप नोंदवून शासनाच्या निदर्शनास आणून समाज जागृती करणे. अभ्यासक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा निर्मुलन या मुल्याच्या जपणुकीसाठी पाठ्यक्रम मंडळावर नियंत्रण ठेवणे, त्याच प्रमाणे शिक्षण क्षेत्रावर जास्तीत-जास्त आम बजेटमध्ये तरतुदीसाठी आग्रही असणे, आदी कार्य या कक्षाच्या माध्यमातून होत असून शासनाला वेळोवेळी बाध्य केले आहे. त्यामुळे या संघटनेकडे शासन एक मार्गदर्शक शिक्षक संघटना म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते.
राजर्षी शाहु शिक्षण परिषद

शिक्षण तज्ञांचं संघटन.

समाजाच्या प्रगतीला पोषक असे शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यास करुन त्याप्रमाणे शासनास मार्गदर्शन करण्याचे, चुकिच्या धोरणाला विरोध करुन त्याचे होणारे दु:ष्परिणाम सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम हा कक्ष करीत आहे.

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (VBVP) 

देशाचा भावी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांचं संघटन.
विद्यार्थी हा देशाचा भावी नागरीक असून संविधानाने या देशाचं भवितव्य प्रत्येक नागरिकाच्या हाती सोपविले आहे. या देशाचा नागरीकच या देशाचा चालक आणि मालक संविधानाने बनवला आहे. अशा या भावी नागरिकाची जडण-घडण विद्यार्थी दशेतच होत असते. विद्यार्थी दशेतला हा काळ त्याच्या भावी आयुष्याचा संवेदनशिल काळ असतो, तेव्हा त्याला योग्य दिशा मिळून स्वयंपूर्ण एक जबाबदार, आपल्या देशाच्या संविधानावर निष्ठा ठेवणारा, आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर निष्ठा बाळगणारा, अंधश्रद्धेला मुठमाती देणारा, विज्ञाननिष्ठ उद्योगशील भावी नागरीक निर्माण व्हावा, याकरीता शिक्षण संस्था, बोर्ड, विद्यापीठ, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम विद्यार्थांच्या समस्यांवर अंकुश ठेवण्याचे काम वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (VBVP) करत आहे.

कृषिरत्न विखे पाटील कृषी कक्ष

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचं संघटन.
भारत हा कृषीप्रधान देश, आपली मुळ बळीराजापासूनची सिंधुजनांची समृद्ध अशी कृषी संस्कृती ! परंतु आर्यांच्या आक्रमणानंतर सोन्याचा धूर निघणाऱ्या या महान वैभवशाली सिंधु संस्कृतिचा ऱ्हास झाला. वैदिकांच्या यज्ञ संस्कृतिचा विरोध करणाऱ्या बळीराजाला वामनानं पाताळात गाडलं, म्हणजे कपटानं खून केला ते आजतागायत सुरु आहे. 

आजही  गळफास घेऊन या देशाचा पोषिंदा असलेला बळीराजा आपले जीवन संपवत आहे. ही वस्तुस्थिती असून ती बदलवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथांना शासनदरबारी वाचा फोडण्याचे काम या कक्षद्वारा केले जात आहे. शेतं तिथं मुबलक पाणी, पिकाला हमी भाव, स्वामीनाथन आयोगाची अम्मलबजावणी, शेतमालासाठी जागतीक बाजारपेठ खुली करण्यासाठी आंदोलन, कच्च्या शेतमालावरील पक्क्या मालाच्या प्रक्रीया लघुउद्योगाला उत्तेजन व अर्थसहाय्य कारण्यासाठी पाठपुरावा  शेतकऱ्यांचे पाच रुपये किलोने टमाटर घेऊन त्या एक किलो टमाटरपासून पाचशे रुपयाचा सॉस बनवून उद्योगपती विकतो. ही शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी, पारंपारीक शेतीऐवजी आधुनिक व्यापारी शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या कक्षाद्वारे केले जात आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड न्यायदान कक्ष

संविधानाचा सन्मान राखून न्यायव्यवस्था बळकट करणाऱ्या वकिलांचं संघटन.
 या देशात धार्मिक उन्माद फार वाढला आहे. बेरोजगारी वाढवून येथील तरुणांना निराशेच्या आणि दारिद्र्याच्या खाईत लोटले आहे. जेणेकरुन अशा नैराश्य आलेल्या दिशाहीन तरुणांची धर्माचे ठेकेदार फौज तयार करुन त्यांच्या हातून धर्माच्या नावावर विध्वंसक कृत्ये सहज करवून घेतले जातात व नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते (use & throw). चुकिचा इतिहास त्यांच्यापुढे मांडून समाजात त्यांच्याकडून कलह निर्माण केल्या जाते. अशा तरुणांचे आयुष्य बरबाद केलं जाते, त्यांचे मास्टरमाईंड पुराव्याअभावी किंवा शासनाच्या उदासिनतेमुळे मोकाट फिरतात. अशांच्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून मुसक्या आवळण्याचे काम, अन्याय -अत्याचाराविरोधात तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी एक वकिलांच संघटन न्यायदान कक्षाच्या रुपाने कार्य करत आहे.

संगीतसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद 

आपला खरा वैभवशाली सांस्कृतिक वारसा कलेच्या माध्यमातून जपणाऱ्या कलाकारांच संघटन.
 मानवी जीवनात कलेला फार अनन्यसाधारन महत्व आहे, कलेमुळेच मानवी जीवनाला सौंदर्य प्राप्त झालं आहे. कलेच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट मानवी मनावर लवकर बिंबवल्या जाऊ शकते, रशियन जनतेला आपली मराठी-हिंदी भाषा कळत नव्हती तरी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शाहीरी व पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना रशियासारख्या विदेशी धर्तीवर पोहचविले, एवढी ताकत एखाद्या कलेत असते चित्रकलेच्या, नाटकाच्या, लघुपट, चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या प्राचीन संस्कृतीचं प्रभावी दर्शन घडवू शकतो, परंतु या क्षेत्रावर उच्चवर्णीयांचाच प्रभाव असल्याने आपल्यापुढे चुकीचे कथानक नाटके चित्रे इत्यादिंच्या माध्यमातून चुकीचा इतिहास रंगवून आपली दिशाभूल करुन शोषण केले, त्यांनी मात्र आपल्या स्वत:च्या मुलींना अभिनेत्री, अॅटमगर्ल सारख्या सोज्वळ नावाने अंगप्रदर्शन करुन अमाप पैसा कमवला, परंतु बहुजनांच्या मुलींनी साधा सलवार नेसला, टिकली लावली नसेल तर आम्ही यांची संस्कृती बाटवत होतो, धर्म बुडवत होतो. म्हणून आता या कक्षाच्या माध्यमातून आपल्या बहुजनांच्या मुलांना या क्षेत्रात संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळून चांगले कलावंत निर्माण व्हावे,त्यांनी फार मोठी प्रगती करुन आर्थिक संपन्न बनावे व आपल्या कलेद्वारा आपला खरा जाज्वल सत्ये इतिहास समाजापुढे मांडून समाज जागृती करुन समाज ऋण फेडण्याचं कार्य हा कक्ष करत आहे.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद कक्ष

आपल्या महान संतांचे विचार व त्यांच्या साहित्याचा प्रसार करणाऱ्या प्रचारकांचं संघटन.

या देशात आर्यांच्या आक्रमणानंतर सिंधु संस्कतीचा ऱ्हास करण्यात आला. या देशात तक्षशिला, नालंदा.... सारखी जगप्रसिद्ध अशी विश्वविद्यापीठे होती. जगातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत एवढी समृद्ध शिक्षण व्यवस्था या देशात होती. त्यामुळेच आपला देश सिंधु संस्कृतित सुखी समृद्ध होता, म्हणूनच तर भारताला सोन्याची चिडीयॉ म्हणत. परंतु या विदेशी आर्यवैदिकांनी ही विश्वविद्यालये व ग्रंथ भांडार जाळून खाक केले, पुढे वर्ण व्यवस्था निर्माण करुन सिंधुजनांना शिक्षणबंदी करुन आर्यवैदिक यांनी शिक्षण क्षेत्र आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी आपल्या सोईनुसार साहित्ये निर्मिती केली. 

अनेक कलोकल्पित पोथ्या पुराणे लिहून आपला सिंधुजनांचा समृद्ध वारसा दुषित केला. आज आपल्या समृद्ध वारशाच्या सत्य इतिहासाचे संशोधन व लेखन करणे, खरा इतिहास आपल्या समाजापर्यंत पोहोचवणे, महापुरुषांचे, संतांचे विचार साहित्याचा प्रचार-प्रसार करणे, स्वत:चं साहित्य निर्माण करणे, प्राचीन साहित्याचा चिकित्सक अभ्यास करुन समाजापुढे विश्लेषक मांडणी करणे, नवोदितांना साहित्ये निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य जगदगुरु तुकोबाराय साहित्ये परिषद या कक्षाद्वारे अविरत सुरु आहे.

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शक  कक्ष 

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन सक्षम उद्योजक तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेलं उद्योजकांच संघटन.
 उद्योगी तरुण हा आपल्या कुटुंबाचं समाजाचं पर्यायाने देशाचं भविष्य बदलवू शकतो. वर्तमान स्थिती बघता सरकारी नोकऱ्या जवळ-जवळ दुरापास्त झाल्या आहेत. बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. हाताला काम नसेल तरं 'विनाशकाले विपरित बुद्धी' या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनात नैराश्य निर्माण होवून आपण अलगद विघातक शक्तीच्या जाळ्यात अडकून तरुण मुलं आपले आयुष्य बरबाद करुन घेतात, तेव्हा तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्याला छोटा-मोठा उद्योग करुन सुखी जीवन जगता यावं, यासाठी यशस्वी उद्योजकांचं एक संघटन उभं करुन त्याद्वारा वेगवेगळ्या उद्योगांबद्धल माहिती, प्रशिक्षण, अर्थसहाय्य, रोजगार मिळवून देण्यास मदत करणे व उद्योगी तरुण निर्माण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेऊन या कक्षाची निर्मिती करण्यात आली असून त्याप्रमाने वाटचाल सुरु आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील मराठा वधु-वर सुचक व सामुहिक विवाह कक्ष

आदर्श नव-दांपत्याची रेशीमगाठ बांधून देण्यास सहाय्य करणारं संघटन.
मातृसत्ताक संस्कृती नष्ट केली गेल्यानंतर स्त्री ही फक्त उपभोगी वस्तू म्हणून या वर्णव्यवस्थेत स्त्रीला स्थान देण्यात येऊन हीन वागणूक देण्यात आली. लग्न म्हणजे स्त्रीचा बोझ असून त्या बदल्यात तिच्या माता-पित्याकडून भरपाई म्हणून हुंडा घेण्याची वाईट प्रथा या वर्ण व्यवस्थेत सुरु झाली. याचा परिणाम अनेक मुली हुंडाबळीच्या शिकार होत आहेत, मुलीचे वडिल कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे, अशा परिस्थितीतून समाजाला जागृत करण्याचं काम बिना हुंड्याने फक्त एक रुपयात मराठा वधु-वर कक्ष शिवविवाह मेळावे घेऊन बिना खर्चाने शेकडो हजारो विवाह या कक्षाच्या माध्यमातून आजपावेतो पार पडत आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष

व्यसनमुक्त निरोगी समाज घडवणाऱ्या समाजसेवकांचं संघटन.
युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतात सुख-समृद्धी शांती नांदावी, देशाचं कल्याण व्हावं, यासाठी मराठा सेवा संघाची महान पुरोगामी चळवळ उभी केली. या चळवळीला गती देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आपापल्या क्षेत्रात या चळवळीचं काम जोमाने पुढे न्यावं, या दृष्टीने ३३ कक्ष निर्माण केले. या कक्षांद्वारे देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे. त्यातला एक कक्ष "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष". निरोगी निर्व्यसनी सुदृढ बलशाली समाजच कोणत्याही देशाची धरोवर असते. मादक पदार्थाचे व्यसन हे मानसाला शारीरिक मानसिक व आर्थिक दुर्बल बनविते, व्यसन हेच मानसाच्या अधोगतीचे दारिद्र्याचे कारण आहे. 

ज्या देशाचा नागरिक दुर्बल तो देश दुर्बल. या देशाला बलशाही बनविण्यासाठी या देशाचा युवक हा निर्व्यसनी असावा, यासाठी राष्ट्रसंतांनी आदर्श मानवी जीवनाच्या संहितेच ग्रामगीतेच्या रुपाने आपल्या जीवनाचं संविधानच जणू राष्ट्रसंतांनी आपल्याला उपलब्ध करुन दिलं. त्यांनी भजनांच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मार्मिक भजने लिहीली व स्वतः गाऊन समाजाला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे व्यसनांचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत आहे. शाळकरी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू गुटखा बिडी सिगारेट दारु चरस भांग गांज्या....आदी मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शासन प्रशासन वर-वर व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम राबवित असल्याचे भासवते, परंतु मुळात मादक पदार्थाचे स्रोत मात्र कायमस्वरुपी बंद करत नाही. कारण सरकारला जनतेच्या आरोग्याची नाही तर महसुलाची चिंता आहे. यामुळेच व्यसनाचे प्रमाण वाढत असून दारिद्र्यात अनारोग्यात वाढ झाली असून देशाचं भवितव्य धोक्यात आलं आहे. 

आमचा विश्वास आहे की, दहा वर्ष रस्ते नाही बणले, विकासाची कामे  नाही झाली, तरी चालेलं परंतु सरकारने ही अंम पदार्थाची- दारुची कारखाने बंद केली, या सर्व अंमली पदार्थाच्या स्त्रोतांवर कडक अंकूश बसवला तर प्रत्येक घर सुखी होईल, पर्यायाने देश सुखी होईल.

"निर्व्यसनी समाज सुखी समाज" हे राष्ट्रसंतांचं अधुरं राहिलेलं स्वप्न मराठा सेवा संघ प्रणित "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसन मुक्ती कक्षाद्वारा" व्यसनमुक्ती शिबिरे, पथनाट्यासारखे कार्यक्रम आयोजित करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच काम राष्ट्रीय स्तरावर सुरु आहे.

संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषद 

संतांचे विचार घरा-घरात पोहोचवून अंधश्रद्धा पाखंडातून समाजाला नवी दिशा देणाऱ्या वारकऱ्यांचं संघटन.
सिंधुजन बहुजनांना वैदिकांच्या पाखंडी दैववादी कर्मकांडातून अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगीरीतून समाजाला मुक्त करण्यासाठी आपल्या अभंगरुपी साहित्यातून या वैदिकांच्या शोषणावर घणाघाती वार केले, हे वार या वैदीकांना एवढे असह्य झाले की, तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडवून संत तुकारामांचाही खून करुन पुष्पक विमानाने वैकुंठाला गेल्याची आरोळी ठोकावी लागली. 

संत नामदेवांनी आणि संत तुकारामांनी एवढं प्रभावी शस्त्र आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी दिलं, परंतु अजूनही त्या अभंग रुपी गाथेचा आपल्या कल्याणासाठी आपण उपयोग करुन घेऊ शकलो नाही, तेव्हा त्यांच्या महान साहित्याचा व विचारांच्या जाणकारांचं संघटन संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषद या कक्षाद्वारे त्यांचं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार कक्ष 

आज सहकार नसेल तर उद्धार संभव नाही. एकीच बळ हे सर्वज्ञात आहे. याच तत्वानुसार सहकारी तत्वावर मराठा सेवा संघाद्वारा सहकार कक्ष स्थापन करण्यात आला.
या कक्षाद्वारा प्रत्येक जिल्ह्यात गावोगांवी सहकारी पतसंस्था स्थापण करण्यात येऊन त्याद्वारा सभासदांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास सक्षम केल्या जाते.

संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष

समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाजाला प्रबोधित करणारांचं संघटन.
आपल्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्येपूर्ण कलेने वक्तृत्व, शाहीरी, काव्य, किर्तन-भजन आदी कला-गुणांनी पारंगत असलेल्यांचं संघटन समाजात प्रबोधन करुन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात हा कक्ष कार्यरत असून आधुनिक समाज घडणीसाठी मोलाचे योगदान देत आहे.

मराठा मार्ग कक्ष 

नवोदित विचारवंतांच्या विचाराचा प्रसार-प्रचार करण्यासाठी साप्ताहिकं, मासिके चालवून मानवी जीवनावर प्रकाश टाकणारे विचार घरा-घरात पोहचविणाऱ्या लेखक साहित्यिकांचं संघटन.
याद्वारा 'मराठा मार्ग' सारखे मासिक दिनदर्शिका नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशित कराण्याचे काम हा कक्ष अविरत करीत आहे.

महात्मा जोतिबा फुले इतिहास अकादमी 

संशोधक नवोदित इतिहासकारांच संघटन.
इतिहासातूनच भविष्याचा मार्ग निघत असतो. आपला इतिहासच जर चुकीचा असेल, तर आपण चुकीच्या मार्गाने जाणार. या देशात शिक्षणसत्ता विशिष्ट वर्गाच्याच हाती असल्याने या देशातील बहुजन उद्धारकांचा इतिहास त्यांनी त्यांच्या सोईनुसार अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिहीला गेला. या देशाचा खरा इतिहास मिटवून कलोकल्पीत आभासी व इतिहासाचं विकृतीकरण करुन अंधश्रद्धेला खतपाणी देणारा इतिहास लिहीला गेल्याने आपल्या महापुरुषांचं कर्तुत्व स्वतःच्या नावाने करुन किंवा ते दैववादी ठरवून मिटविलं गेलं. त्यामुळे अनेक बहुजन महामानवांचे खरे कार्य समाजापर्यंत पोहचले नाही. तेव्हा हा इतिहास कक्ष या इतिहासाचा संशोधनात्मक व चिकित्सक अभ्यास करुन खरा इतिहास समाजापुढे मांडण्याचं काम करत आहे.

डॉ. रुखमाबाई राऊत आरोग्य कक्ष

मन मनगट आणि मेंदू हे तीन 'म' ज्या माणसाचे सशक्त आणि सुदृढ असेल तोच माणूस आपल्या जीवनात क्रांती किंवा प्रगती करु शकतो, यासाठी निरोगी शरीर हेच खरं धन आहे. बहुजन समाजाचं स्वास्थ जपण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डाॕक्टरांचं संघटन भारताच्या पहिल्या महिला डाॕक्टर... डॉ. रुखमाबाई राऊत यांच्या नावाने हा कक्ष कार्य करत आहे.

तानुबाई बिरजे पत्रकार परिषद 

प्रामाणिक पत्रकारांचं संघटन.

निर्भय निरपेक्ष पत्रकारिता म्हणजे सुदृढ लोकशाहीचे लक्षण ! आज भारतीय लोकशाहीचे  संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि मिडीया चारही स्तंभ कमजोर आणि खिळखिळे झाल्याचे जाणवत आहे. ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह? प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह?न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह? पत्रकारीतेवर प्रश्नचिन्ह? यावरुन ह्या चारही स्तंभाला सत्ता आणि पैसा याचा गंज लागला असून ही लोकशाहीची इमारत कोसळते की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. या चारही स्तंभाने सत्तेपुढे घुटणे टेकल्याची जाणीव प्रत्येक सुज्ञ नागरिकाला होत आहे.

चौथा स्तंभ मिडीया अतिशय महत्त्वाचा आहे, कारण इतर तिन्ही स्तंभावर याचा प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाणे मिडिया प्रिंट असो की इलेक्ट्रॉनीक असो विशेष म्हणजे समाज मनावर गहरा प्रभाव पाडत असतो. त्यामुळे या स्तंभाची जबाबदारी देशामध्ये शांतता सहिष्णुता, प्रेम, बंधु-भाव ही मुल्यं जपण्याचे काम मिडीया याच स्तंभावर आहे. 

या मुल्यावरच लोकशाही उभी आहे. जर का मिडीया धर्म, जात, पंथ, पक्ष, निरपेक्ष नसेल, तर या मुल्यांना तडा जाऊन देशाची काय परिस्थिती होईल, याची कल्पना करणेच कठीण. तीच भिती आजची परिस्थिती बघता वाटते. भर दिल्ली दरबारात संविधानाला जाळणाऱ्या शक्ती संविधान बदलविण्याची भाषा करतांना दिसते. प्रत्येक घटनेत धर्मांध शक्ती धार्मिक द्वेषाचे जहर पेरतांना दिसते. ज्या महापुरुषांनी या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बलिदान दिले, त्यांच्या खूनाची तहान अजूनही भागली नसणारे त्यांच्या प्रतिमांवर गोळ्या झाडतांना दिसतात. साधुच्या वेषातले आतंकवादी शस्त्र प्रदर्शन करतांना दिसतात. तेव्हा या देशाचे भविष्य धोकादायक अंध:काराच्या गर्द छायेत दिसायला लागते. या निराशेच्या छायेतही नितीमूल्यांनी परिपूर्ण एखादा पत्रकार बघून कुठं तरी आशेचा किरण दिसतो. या किरणाचा प्रवास किती खडतर असतो, हे सुद्धा समजून घेण्यासाठी भक्तांनी भक्ती त्यागून निरपेक्ष समजून घेणे तेवढेच महत्वाचे असते. 

आज मिडीयावर मनुवाद्यांची मालकी व कब्जा असल्याने अशा निर्भिड सच्च्या पत्रकारांना कशा प्रकारे वाळीत टाकलं जातं, याचा पदो-पदी प्रत्यय येतो. प्रसार माध्यमं विसरेल, परंतु सुज्ञ जनता मात्र त्यांचे कार्य कधीच विसरणार नाही.

जेव्हा-जेव्हा पत्रकारितेचा विषय येईल, तेव्हा-तेव्हा अशा पत्रकारांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कोणतेही राजकीय विश्लेषण असो, कोणतीही घटना असो तिचे अभ्यासपूर्ण सटीक असं निर्भय-निरपेक्ष विवेचन करुन सत्य हकिकत जन-माणसांपर्यंत पोहोचवणारी पत्रकारिता आणि पत्रकार फारच दुर्मिळ असतात. हे कार्य पार पाडत असतांना त्याच्यापुढे संकटांचा डोंगर उभा असतो, परंतु असा पत्रकार कसल्याच संकटाला भिक घालत नसतो. अशा निर्भिड पत्रकारांचं संघटन असणे काळाची गरज आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम तानुबाई बिरजे पत्रकार  कक्ष करीत आहे.

प्रचार-प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. हा स्तंभ जर भ्रष्टाचारानं पोखरला तर लोकशाही डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकिय क्षेत्रात तटस्थपणे भूमिका बजावणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांची लोकशाही वाचविण्यासाठी देशाला गरज आहे. अशा लोकशाही मुल्याचं संवर्धन करण्याचं काम तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष करीत आहे.

महाराणा प्रताप बालकल्याण कक्ष (विद्यार्थी दत्तक कक्ष) 

सेवाभावी उदार लोकांचं संघटन.
देशाचा पाया हा आदर्श नागरीक आहे. आदर्श नागरीकाचा पाया विद्यार्थी दशेत रचल्या जातो. त्यासाठी समाजाच्या तळागाळात शिक्षण पोहोचणे गरजेचे आहे. गरीब होतकरु मुलांला त्याच्या शिक्षणासाठी सहाय्य करणाऱ्या उदार अंतःकरण असणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शहरांमध्ये मोठ-मोठे निवासी बंगले खाली पडलेले आहेत. त्यात राहण्यासाठी परिवार नाही, तिथे फक्त कुत्रा आणि चौकीदार निवास करतो, असे बंगले ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब मुलांना तात्पुरती नि:शुल्क निवासी सोय करुन देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या या कक्षाच्या माध्यमातून आवाहन केलं, त्यात बऱ्यापैकी यश मिळत आहे.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विश्व शाहीर परिषद 

शाहीर कलाकारांच संघटन.

शाहीरी हे लोककलेच उत्तम असं जनजागृतीच साधन आहे. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांना आपल्या शाहीरीद्वारा रशियापर्यंत जगात पोहचविले. या कक्षाद्वारा समाज जागृतीचं काम प्रभावीपणे करण्यात येत आहे.

समेट कक्ष
मानवी जीवन हे संघर्षमय आहे. आयुष्याच्या अनेक टप्यावर अनेक कारणांनी एक दुसऱ्या सोबत मतभेद होऊन संबंध ताणले जातात. त्यातूनच दुरावा निर्माण होऊन माणूस माणसापासून तुटत असतो. अशा वेळेस त्यांचे संबंध पुर्ववत करण्यास सामंजस्य घडवून आणण्याचं काम समेट कक्ष करीत आहे.

अशाप्रकारे मंत्रालय कामकाज कक्ष, डॉक्टरांचं संघटन आरोग्य कक्ष, अभियंत्याचे संघटन, खेळाडूंचे संघटन, अधिकाऱ्यांचं संघटनं, शिवराज्य पक्षाच्या माध्यमातून राजकिय पदाधिकाऱ्यांचं संघटन...इ. आपापल्या कक्षाद्वारा समाजोद्धाराचे कार्य करत आहे. लेखप्रपंच वाढत असल्यामुळे विस्ताराने न घेता थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

"शिवधर्माचे प्रकटन विश्वातील महान क्रांतीकारक घटना" शिवधर्म संसद
मराठा सेवा संघाद्वारा या देशातल्या ८५ टक्के सिंधुजनांना शिवधर्माच्या रुपाने आपल्या अती प्राचीन वैभवशाली मातृसत्ताक सिंधु संस्कृतिचा वारसा परत मिळवून दिला, ही फार मोठी उपलब्धी आहे.

मानवी जीवनामध्ये धर्म ही मुलभूत गरज नसली तरी धर्माचे स्थान संवेदनशील बणविले गेले आहे, धर्मरक्षणाच्या नावावर माणूस वाट्टेल ते करण्यास वेळप्रसंगी प्राणही देण्यास एका पायावर तयार होतो. एवढा नाजुक आणि संवेदनशील विषय हाताळतांना 'शिवधर्म गाथेच्या रुपाने इतर धर्माला कसलाही धक्का न लावता सखोल अभ्यासांती सर्व विवेकवादी पुरोगामी सिंधुजनांना आपल्या खऱ्या धर्माचा व संस्कृतिचा परिचय करुन दिला.

कोणत्याही धर्माला धर्म संस्थापकाचे व धर्मग्रंथाचे एक अधिष्ठान असते. जगामध्ये जे-जे प्रचलीत धर्म आहेत, त्यांचा संस्थापक किंवा उपदेशक व आचरणाचा एक विशिष्ट धर्मग्रंथ आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर अशा धर्मांची नोंद होऊन मान्यता मिळीली अन् प्रसार-प्रचार झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातील प्रत्येक देशात थोड्या फार प्रमाणात त्या-त्या देशातल्या स्थानिकांमध्ये बौद्ध, मुस्लीम, ख्रिच्चन धर्म पाहवयास मिळतो, परंतु हिंदू हा धर्म भारताऐवजी जगात इतरत्र जगातल्या प्राचीन अखंड भारत  वगळता इतर देशाच्या स्थानिकांमध्ये दिसत नाही, इतर देशात कोणी हिंदू असेलही ! तरी तो भारतातून गेलेलाच असेल, यावरुन स्पष्ट होते की, हिंदू या धर्माला जागतिक मान्यता नाही. कारण या धर्माचा विशिष्ट धर्मग्रंथ किंवा संस्थापक नाही. त्यामुळे या धर्माचा जगात प्रचार- प्रसार होवू शकला नाही. त्यामुळे हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती, जीवन प्रणाली असल्याचे सर्वोच्च न्यायालय तथा अनेक विद्वानांनी स्पष्ट केले आहे. 

आपली ही जीवनप्रणाली महान निसर्गपूजक सिंधु संस्कृती असून ही संस्कृति म्हणजे बळीवंशापासून चालत आलेला शिवाचा खरा शिवधर्म आहे, कालांतराने अपभ्रंषाने किंवा कोणाच्या हिन दुषणं देण्यावरुन सिंधु चे हिंदु असे प्रचलन झाले ! पुढे आर्य वैदीकांनी या महान संस्कृतीवर आक्रमण करुन होम, हवन, बली, यज्ञासारखी अंधश्रद्धेची कर्मकांड घुसडवून ही संस्कृती विद्रुप केली, याला विरोध करणाऱ्या आपल्या महापुरुषांचे कपटाने खून केले गेले, त्याच्यावर काल्पनिक कथा रचून कपोकल्पित साहित्ये तयार केले गेले, त्याद्वारे आपल्याला मानसिक गुलाम करुन श्रद्धेच्या, आस्थेच्या नावावर आपली लुट सुरु केली. आम्ही आमच्या घामाचा, कष्टाचा मेहनतीचा पैसा पोटाला चिमटा मारुन मंदिराच्या दानपेट्यात दान म्हणून भरत गेलो आणि त्यावर हा तीन टक्के शोषक वर्ग शक्तीशाली बनून आपल्यावर राज करत आहे, आजतागायत आपण त्यांच्या शोषणाचे बळी ठरत आहो.

मराठा सेवा संघाने सखोल प्राचीन साहित्याच्या चिकित्सक  अभ्यासाअंती या आपल्या पुरातन शिवधर्माचे पुनरुज्जीवन करुन जिजाऊ जन्मोत्सव दिनी, १२ जानेवारी २००५ ला  मातृसत्तेचं मॉ. जिजाऊ हे प्रतिक डोळ्यासमोर ठेऊन मातृतिर्थ सिंधखेडराजा येथे शिवधर्माचे प्रकटन केले व या देशातील सर्व सिंधुजनांना शिवधर्म संसदेने आपला ऐतिहासिक शिवधर्माचा खरा वारसा "शिवधर्म गाथे" च्या रुपाने आचरणासाठी उपलब्ध करुन दिला. त्याप्रमाणे आज बहुसंख्य सिंधुजनांनी आचरण करणे सुरु केले आहे, ही विश्वातली महान क्रांतीकारक घटना आहे.

मराठा सेवा संघ या महान पुरोगामी चळवळीने  आम्हाला दिलेल्या प्रमुख १० गोष्टी... !
१) आम्हांवर कधीच जादु-टोणा-भूत-प्रेताचा असर होणार नाही, असं आमच्या शरीरातल्या मेंदूचं लसीकरण करुन वैज्ञानिक दृष्टीकोन आमच्यात रुजवला.
२) आम्ही कधीच अफवेच्या बंदुकीच्या गोळीने मरणार नाही, अशी वैचारिक लस देऊन आमचं मन, मनगट, मेंदु सशक्त बणवलं.
३) शोषकांचे अदृष्य कपट कारस्थान स्पष्टपणे दिसण्याची व्यापक दृष्टी आम्हाला दिली.
४) दैववाद अंधश्रद्धा कर्मकांड यासारख्या मानसिक गुलामीच्या कैदेतून आमची सुटका करुन भयमुक्त मानवतावादी स्वातंत्र्याचा आनंद मिळवून दिला.
५) जीवन-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करुन जेवढं आयुष्य आहे, त्यात माणुसकीचं आदर्श जीवन जगण्याची उमंग दिली.
६) हातातले दगड-धोंडे, तलवार, भाले-बिचवे, बारुद-बंदूक काढून त्याऐवजी सर्वांवर मात करणारं पुस्तकरुपी लेखणीरुपी शस्त्र आमच्या हातात दिलं.
७) दुसऱ्याचं ऐकून वाचून खरं काय? खोटं काय? याची चिकित्सा करुन स्वतःचं साहित्य निर्माण करण्याची धमक आमच्यात निर्माण केली.
८) आमच्या घरातील कपाट भांडी-कुंडी, कपडे-लत्ते व शोभेच्या वस्तूंनी भरले होते, परंतु आज आमच्या घरातली कपाट पुस्तकांनी भरण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं.
९) जात-धर्म, पंथ-पक्ष यापुढे जाऊन मानव आणि मानवता हाच खरा धर्म असा व्यापक दृष्टीकोन देऊन देशाला धार्मिक व जातीय विद्वेषापासून रोखले. शांती व सौहार्द प्रस्थापित करण्याचं फार मोठे कार्य आमच्या हातून केले.
१०) आमच्या हिंदु धर्माचं शुद्धीकरण करुन खऱ्या महान प्राचीन मातृसत्ताक निसर्गपूजक सिंधु शिवसंस्कृतिचे शिवधर्माच्या माध्यमातून प्रकटन करुन आमच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करुन दिली. धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करुन आदर्श जीवनाच्या आचरणासाठी आपला सिंधुजनांचा खरा धर्म "शिवधर्म" दिला.

आज शिवधर्माचे आचरण सुमारे दोन कोटी लोक आपल्या जीवनात अंगीकारत आहे. गरीबातला गरीब माणूस वर्षभरात कमीत-कमी अनाठाई पंधरा हजार रुपये कर्मकांडावर खर्च करतो. आज आपण दोन कोटी लोकांचे कमीत कमी तीस हजार कोटी शिवधर्माच्या माध्यमातून कर्मकांडावर होणारा लोकांचा खर्च शिवधर्माच्या आचरणाने वाचवला आहे.

मराठा सेवा संघाची ही क्रांतीकारक पुरोगामी चळवळ ३३ कक्षाच्या माध्यमातून देशाच्या एकतेला, अखंडतेला, धर्मनिरपेक्षतेला, बंधुभावाला, सहिष्णूतेला बाधा पोहचवणाऱ्या शक्तींवर अंकूश ठेऊन देशसेवेचे महान कार्य करत आहे.

मराठा सेवा संघाची उपलब्धी

१, मराठा सेवा संघाच्या वैचारिक क्रांतीमुळे धार्मिक जातीय दंगलीत कमालीची घट होवून देशात सामाजिक संवार्ध राखण्यात यश.
२, मराठा सेवा संघाने सत्य इतिहास समाजापर्यंत पोहोचविल्याने अंधश्रद्धा दूर करुन समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यात यश.
३, शिक्षणाचं महत्व घरा-घरात पोहोचवून घर तिथ वाचनालय, घरा-घरात पुस्तकांची कपाटं निर्माण करुन शस्त्र दगड-धोंडे ऐवजी हातात पेन देऊन मोठ्या प्रमाणात प्रशासकिय अधिकारी, उद्योजक साहित्यिक, आदर्श नागरीक  निर्माण करण्यात यश.
४, रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी मार्गदर्शन शिबीरे तथा गरीब बहुजनांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह व अभ्यासिकेची सोय उपलब्ध करुन दिली.
५, मातृतिर्थ सिंधखेडराजा येथे भव्य सर्व सामाजिक दायित्वाच्या सुविधायुक्त जिजाऊ सृष्टी प्रकल्प निर्माणाधीन. याकरीता शिवप्रेमीकडून ₹ १ रुपया पासून आपल्या इच्छेनुसार थेट जिजाऊ सृष्टीच्या खात्यात आनलाईन शिवदान करण्याची सुविधा.
६, नागपूर येथे भव्य बळीराजा कृषी संशोधन केंद्राची निर्मीती. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधन होऊन आत्महत्त्या रोखण्यास मदत होईल.
७, गांव तिथं शाखाद्वारा गावाच्या समस्यांबद्धल लढा देणे.
८, स्पर्धा परिक्षाचे मोफत मार्गदर्शन वर्ग तथा होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.
९, इयत्ता दुसरी ते नववी च्या विद्यार्थांसाठी UPSE & MPSE च्या धर्तीवर RTSE (Rational Talent Search Examination) ही राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा दर वर्षी डॉ. पं. दे. रा. शि. प. कक्षाद्वारा आयोजित करण्यात येऊन पात्र विद्यार्थांना स्कॉलरशिप, तथा गोल्ड, सिल्व्हर मेडल ने पुरस्कृत करण्यात येते.
१०, प्रत्येक कक्षाचे तालुका, जिल्हा, राज्य तथा राष्ट्रीय अधिवेशने, परिषदांचे आयोजन.
११, प्रत्येक जिल्ह्यात जिजाऊ सहकारी पतसंस्था स्थापन.
१२, वधु-वर कक्षाच्या माध्यमातून शिवविवाह मेळाव्याचे आयोजन करुन विना खर्ची शेकडो शिवविवाह पार पाडले जातात.
१३, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, बाल संस्कार शिबीरे, व्याख्यानमाला, प्रबोधन शिबीरे आदी उपक्रमांतून समाजजागृती... इत्यादी अनेक उपक्रम
१४, सुशिक्षित बेरोजगार युवकांना देश-विदेशात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन
१५, समाज जागृतीसाठी उत्कृष्ठ कॕडर वक्ते  मराठा सेवा संघाच्या चळवळीत तयार झाले.

विनम्र आवाहन:  सन्माननिय अॅड. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मोठ्या कष्टानं वाढवलेल्या मराठा सेवा संघ या लोक चळवळीने अनेकांना मोठ केलं. आपणही तन-मन-धनाने चळवळीला अधिक मोठं करुया.
वर्तमान युगातील महान अशा मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीच्या ३६ व्या वर्धापन दिनाला कोटी-कोटी शिव शुभेच्छा...!

                     ।। जय जिजाऊ।।
                             🙏🏼🙏🏼
शब्दांकन -

रामचंद्र सालेकर,

शुभेच्छुक:
डॉ. विकास पाटील
विद्यानंद पाटील

To Top