ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त एच. एम. सामाजिक संघटनेच्यावतीने पार पडले रक्तदान शिबिर

shivrajya patra

'
सोलापूर : ईद-ए- मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त एच. एम. सामाजिक संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन एच एम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास नगरसेवक डॉ. किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुबेर बागवान, ज्ञानेश्वर कारभारी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सादीक हुंडेकरी, तौसिफ बिजापूरे, माजिद पटेल, तौफीक  बागवान, सुलेमान चामाकोरा, महेबूब बागवान, रफिक हणगी, इब्राहिम बागवान, मोहसीन इनामदार, रजाक नालवार, मुबीन बेलमे, लालअहमद शेख, चाँद दखणी, मौला दहिटणे व तसेच भागातील ज्येष्ठ नागरिक व सर्व एच. एम. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन बागवान यांनी सर्वांचं आभार मानले.

To Top