सोलापूर/09 : ABP माझा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अफताब शेख आणि महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर संचालक गणेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. उभयतांची कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
येथील जिल्हा परिषद आवारातील बागेत आयोजित शुभेच्छा सोहळ्यात, ABP माझा चे प्रतिनिधी अफताब शेख आणि महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर गणेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम अप्पाश्री मित्रपरिवार, तिसरी आँख मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अफताब शेख आणि गणेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उभयतांचा शाल, टोपी आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध संघटनांचे पदाधिकारी-सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार इक्बाल शेख, नितीन करजोळे, इम्तियाज अक्कलकोटकर, अशोक ढोणे, अक्षय बबलाद, सिद्धाराम नंदर्गी, अमोल कुलकर्णी, विजयकुमार उघडे, प्रवीण पारवे, मोहन थळंगे, साजिद मकानदार, दैनिक पुढारी न्यूजचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड, सांज दैनिक जनमंथन, पुणेचे सोलापूर प्रतिनिधी जुल्फिकार वड्डो, महाराष्ट्र क्राईम रिपोर्टरचे मुख्य संपादक आर. डी. जाधव, अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघचे जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडागळे तसेच प्रदीप गायकवाड यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय वातावरणात पार पडला.



