साेलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील कुसुम किसनराव पाटील यांचं मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मृत्यूसमयी 85 वर्षीय होत्या. त्यांच्यावर बुधवारी सकाळी मार्डी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे. मार्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
