राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे 05 वे राष्ट्रीय एक दिवसीय अधिवेशन हैद्राबाद येथे आयोजन

shivrajya patra

सोलापूर : राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे 05 वे राष्ट्रीय एक दिवसीय अधिवेशन शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी हैद्राबाद येथील सुंदरय्या विज्ञान केंद्रम ट्रस्ट (तेलंगाना) येथे होणार आहे. या अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. 

हजरत मौलाना डॉक्टर सईद अहमद उमरी (आंध्र प्रदेश) यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात आलंय. या राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अधिवेशनात यामध्ये देशभरातील विविध अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.


राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल, सामाजिक कार्यकर्ता हजरत सय्यद नादे अली (वडोदरा, गुजरात), रिटायर्ड आयपीएस आणि पूर्व डीजीपी एम. डब्ल्यू. अन्सारी (मध्य प्रदेश), सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता अॅडवोकेट आदिल अहमद (नवी दिल्ली), क्षत्रिय मूलनिवासी महासंघाचे आंतरराष्ट्रीय को-ऑर्डिनेटर कुलदीप सिंह राठौर  (नॉर्वे), अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी इंजिनीयर मन्सूर अता (अलीगड) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


तरी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व बहुजन समाजाने तन, मन, धन देऊन या कार्यक्रमास हजर राहून अधिवेशन यशस्वी करण्याकरीता हातभार लावावा, असं आवाहन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनिअर सय्यद मकसूद आणि जनाब चांद मोहम्मद (राष्ट्रीय प्रभारी, नवी दिल्ली) यांनी केलं आहे.

To Top