माळशिरस : तालुक्यातील मौजे सदाशिवनगर/पुरंदावडे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते 101 रोपट्यांचं वृक्षारोपण करण्यात आले. कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर च्या NSS विद्यार्थ्यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
त्यानंतर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सदाशिवनगरातील प्रज्योत तात्या सालगुडे पाटील गणेश उत्सव मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाला भेट दिली.
यावेळी पंढरपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, अकलूज पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक विशाल नवले, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी, सदाशिवनगर व पुरंदावडे गावातील सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी शिक्षक कर्मचारी आणि सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


