जागतिक छायाचित्रकार दिनी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचा सन्मान छायाचित्रकार आणि पत्रकार यांच्या रूपाने मला भेटले अनेक भाऊ : खा. प्रणिती शिंदे

shivrajya patra

सोलापूर : छायाचित्रकार आणि पत्रकार यांच्या रूपाने मला आज अनेक भाऊ भेटले आहेत. त्यांच्या मनगटावर राखी बांधताना मला भाऊ नसल्याची खंत आता वाटत नाही. कारण मला आज छायाचित्रकारांच्या रूपात अनेक भाऊ भेटले असल्याचे भावनिक उद्गार सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी काढले.

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सी ब्लॉकचे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या वतीने छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार शिंदे या बोलत होत्या.

या सोहळ्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रक्षाबंधनानिमित्त खा. प्रणिती शिंदे यांनी राखी बांधून सर्व छायाचित्रकार व्हिडिओग्राफर पत्रकार यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण, तिरुपती परकीपंडला, महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमशंकर टेकाळे, कुणाल गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड, गणेश डोंगरे, युवराज जाधव, गोपाळ नंदुरकर, माऊली जाधव, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, ॲड. कमरुनिसा बागवान, अरुणा वर्मा, मुमताज तांबोळे, अनिता भालेराव, ज्योती गायकवाड, सागर उबाळे, अनिल मस्के, सुभाष वाघमारे यांच्यासह सर्व  दैनिकांचे छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**


To Top