रामजी कश्यप, श्रावणी सूर्यवंशी, श्रीकांत शेटे आणि राजीव देसाई समृद्धी क्रीडा सेवा पुरस्काराचे मानकरी

shivrajya patra

सोलापूर/26 : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्टस्‌‍ क्लबच्या वतीने समृद्धी क्रीडा सेवा पुरस्काराची घोषणा झाली. खो-खो पटू रामजी कश्यप, जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे तर श्रीकांत शेटे प्रशिक्षक आणि राजीव देसाई संघटक पुरस्काराचे मानकरी असल्याचे क्लबचे संस्थापक सचिव संजय सावंत यांनी जाहीर केले.

समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत प्रोत्साहन देण्यासाठी  हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या या पुरस्काराचे दुसरं वर्ष आहे. 

यंदाच्या वर्षी हे पुरस्कार अनुक्रमे रामजी कश्यप (खो-खो), आंतरराष्ट्रीय खेळाडू जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी (डायव्हिंग) तर आंतरराष्ट्रीय डायव्हिंग प्रशिक्षक श्रीकांत शेटे आणि लॉन टेनिसचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटक राजीव देसाई यांना जाहीर झाला. 

येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात शनिवारी, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी निमंत्रीत मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी समृद्धी स्पोर्ट्स क्लब च्या 50 राष्ट्रीय खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी क्रीडा पत्रकार अजितकुमार संगवे, माजी तालुका क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सत्येन जाधव आणि तालूका क्रीडाधिकारी गणेश पवार यांची निवड समिती नियुक्ती केली होती. या निवड समितीने ही निवड केली.

हा पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समृद्धी स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष राजू प्याटी, उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू, अंबादास पांढरे, कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे, कार्याध्यक्ष सुरेश भोसले, सल्लागार चंद्रकांत होळकर, रमेश बसाटे, मल्हारी बनसोडे , कृष्णकांत चव्हाण, अविनाश गोडसे, फैजअहमद बेगमपूरे, संजय अंबोले, बाबासाहेब माने, श्रीनिवास कामुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम शेंडगे, बी. डी. राठोड, संतोष जाधव, पुंडलिक कलखांबकर, गणेश कुडले, शाहनवाज मुल्ला, प्रमोद कुरकुळ्ळी, श्रीमंत कोळी, शिवाजी वसपटे, व्यंकप्पा शेंडगे आणि समृद्धी स्पोर्टस क्लबचे प्रसिद्धी प्रमुख श्रीमंत कोळी हे सदस्य प्रयत्नशील आहेत.

------

... असं आहे पुरस्काराचं स्वरूप !

पुरस्कार जाहीर झालेल्या पुरुष आणि महिला खेळाडूंना प्रत्येकी 3,100 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल तर संघटक आणि प्रशिक्षक यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 

*****

To Top