कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची 'मानद कर्नल' पदी निवड सोलापूर सोशल महाविद्यालयाच्यावतीने सत्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना एनसीसी संचालनालय, महाराष्ट्र यांच्यावतीने 'मानद कर्नल' (Honorary Colonel & Colonel Commandant) हा अत्यंत मानाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या विशेष सन्मानाबद्दल सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, सेनेट सदस्य प्रा. डॉ. जैनुद्दीन मुल्ला, मेजर प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्रमुख प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. 

एनसीसीच्या या सर्वोच्च मानद पदवीमुळे विद्यापीठाच्या व एकूणच सोलापूरच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली असल्याचे मत प्र. प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी आणि सिनेट सदस्य प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला आणि मेजर प्रा. डॉ. ग़ौस अहमद शेख यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सोलापूर सोशल असो आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेजच्या या सत्काराबद्दल आभार मानले. एनसीसी आणि तरुणांमध्ये शिस्त, राष्ट्रभक्ती व सेवाभावाची रुजवणूक करण्यासाठी हे पद अधिक जबाबदारीने कार्यरत राहण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

To Top