ज्येष्ठ पत्रकार संजय निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

shivrajya patra

पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांच्या हस्ते विशेष सत्कार

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) : पत्रकार संजय निंबाळकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच समाजातील तळा-गाळातील लोकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी केले.

नि:ष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने प्राधान्याने मांडणारे ज्येष्ठ पत्रकार संजय निंबाळकर यांचा वाढदिवस शनिवारी, 01 ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा झाला. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सभापती दत्ता मगर यांनी हजर राहून पत्रकार निंबाळकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मगर बोलत होते.

या निमित्ताने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केलं. सभापती मगर यांनी पत्रकार निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. त्यानंतर त्यांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या.

संजय निंबाळकर यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, याच माझ्या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आहेत." असंही सभापती मगर यांनी अभिष्टचिंतन केलं.

पत्रकार संजय निंबाळकर यांनी आपल्या लेखणीतून समाजाला नेहमीच योग्य दिशा दाखवण्याचे काम केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात हितचिंतक, मित्रपरिवार व चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

या कार्यक्रमादरम्यान इतरही अनेक स्थानिक नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सर्व उपस्थित मान्यवर, पंचायत समिती सभापती दत्ता मगर आणि मित्रपरिवाराचे प्रारंभी पत्रकार संजय निंबाळकर यांनी मनःपूर्वक आभार मानले. 

... चौकट

... माझी लेखणी यापुढेही अशीच अविरत चालत राहील !

'' मी समाजाप्रती असलेली माझी बांधिलकी कधीही विसरणार नाही. जनसामान्यांच्या हक्कासाठी माझी लेखणी यापुढेही अशीच अविरत चालत राहील." 

संजय निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार.

To Top