कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी नागनाथ सर्वगोड तर सरचिटणीसपदी सुनील गायकवाड

shivrajya patra

राजा सोनकांबळे यांची सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख विभागीय सल्लागार म्हणून बिनविरोध निवड 

सोलापूर : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, भारत सरकार (नवी दिल्ली) व अनुसूचित जाती-जमाती मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त असलेल्या कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची शनिवारी,01 ऑगस्ट रोजी सकाळी उत्साही वातावरणात बैठक पार पडली. या बैठकीत कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे नूतन विभागीय अध्यक्ष नागनाथ सर्वगोड तर नुतन विभागीय सरचिटणीसपदी सुनील गायकवाड यांची निवड करण्यात आली.

यावेळी सन 2026-27 या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्याची नुतन विभागीय कार्यकाररिणी निवडण्यात आली. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष नागनाथ सर्वगोड (सोलापूर आगार) यांची तर सरचिटणीस सुनील गायकवाड (सोलापूर आगार) यांची एकमताने निवड करण्यात आली. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अभ्यासू विभागीय सरचिटणीस राजा सोनकांबळे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी विभागीय कार्याध्यक्ष बालाजी कांबळे (सोलापूर आगार) यांची निवड करण्यात आली असून कोषाध्यक्षपदी विजयकुमार क्षिरसागर (सोलापूर आगार) यांची निवड करण्यात आली.

राजा सोनकांबळे यांची सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख विभागीय सल्लागार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. हरिदास नरखेडकर (सोलापूर कार्यशाळा) यांची विधी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष म्हणून ईश्वर आठवले (मंगळवेढा आगार), संघटक-अश्लेष काटे (सोलापूर आगार), संघटक सचिव -जयभिम रोडे, सहसचिव- यशोधन काळे, संपर्क प्रमुख - सिद्धार्थ घाडगे यांची निवड करण्यात आलेली आहे.     

या बैठकीला कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे माजी सरचिटणीस तथा नूतन ज्येष्ठ सल्लागार राजा सोनकांबळे, ज्येष्ठ नेते नागनाथ सर्वगोड, सुनील गायकवाड, युवा नेते अनिल गायकवाड या प्रमुख  पदाधिकाऱ्यांच्यासह संतोष उबाळे, मारुती मेंढापुरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य सभासद बैठकीस उपस्थित होते.

ही बैठक संपल्यानंतर कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे नूतन विभागीय पदाधिकारी तसेच आगार पदाधिकाऱ्यांनी रा. प. महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांच्या दालनात समक्ष भेट घेऊन सन 2026-27 या वर्षांकरीता नव्याने निवड झालेली विभागीय कार्यकारणीची यादी सादर करण्यात आली.

विभाग नियंत्रक गोंजारी यांनी कास्ट्राईब संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीला मनापासून शुभेच्छा देत कास्ट्राईब संघटनेची कुठलीही समस्या, अडी-अडचणी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असं आश्वासन नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले.
***

To Top