सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

shivrajya patra

सोलापूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पार्क चौक) चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर आणि महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त सैनिक अधिकारी व कर्मचारी यांची यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवपुत्र घटकाबळे यांच्या नेतृत्वाखाली बिगुलाच्या निनादात भारतीय तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. उपस्थितांनी सामुहिकरीत्या राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मस्के यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून, मिळालेले स्वातंत्र्य देशहितासाठी जपणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

याप्रसंगी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे डॉ. अंगद मुके, नाना गाडे, गौतम चंदनशिवे, शांताराम वाघमारे, किसन सुरवसे, सुधाकर सुरवसे, गोपी कांबळे, नागेश गायकवाड, श्रीमंत गायकवाड, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, अशोक सोनवणे तसेच यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशनचे कमलाकर कांबळे, शिवपुत्र घटकाबळे, मारुती मोरे, शंभूदेव सुरवसे, लिंबाजी कांबळे, विष्णू वाघमारे, मल्लिकार्जुन धसाडे, मसण्णा मणुरे, सुरेश गेजगे, चंद्रकांत बनसोडे, राहुल साबळे, गुंडू केंगार, अशोक कांबळे, श्रीकांत गजघाटे, सिद्धार्थ गायकवाडे, सुरेश खलसोडे, गणपत आयगोळे, सत्यवान वाघमारे, नागनाथ शिंदे, विवेकानंद सावंत, भाऊसाहेब वंजारी, भारत कांबळे आदींसह आंबेडकरप्रेमी सुजाण नागरिक, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या शेवटी शाक्य संस्थेचे डॉ. अंगद मुके यांनी उपस्थितांचे आभार मानून सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

To Top