सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचे वडील स्वर्गीय सुरेश लिंबाजीराव पाटील यांच्या 07 व्या स्मृतिदिनानिमित्त मोहोळ येथील सावली बंगला इथं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 
याप्रसंगी शिक्षण संघटनेचे महबूब तांबोळी, मोहोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रमेश बारस्कर, 
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, एजाज शेख, शिक्षक-पदाधिकारी आणि मित्र परिवार आदी उपस्थित होते.
