या यशामागे नक्कीच आई-वडिलांच्या आर्शिवादाबरोबर मित्र मंडळींच्या सदिच्छा-उभयतांनी व्यक्त केली कृतज्ञता
सोलापूर : शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गुणवंत शिक्षक महेमूद नवाज जहागीरदार आणि सुहेल नाईक यांची केंद्र प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याने इंडियन युथ असोसिएशन व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने अॅड. मुजाहीद इनामदार यांच्या हस्ते शाल हार तसंच श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड इनामदार , प्रा. डॉ. म. शफी चोबदार, रोटरी क्लबचे इक्बाल बागबान, इंडियन युथ असोसिएशनचे मजहर अल्लोळी, अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी मर्गदर्शन करत उभयतांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . 
उर्दू-मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी होते.
'आमच्या मेहनतीचा फळ आम्हांस या पदाच्या रूपाने मिळालं, या यशामागे नक्कीच आई-वडिलांच्या आर्शिवादाबरोबर आपल्यासारखे मित्र मंडळींच्या सदिच्छा असल्यानेच आम्ही आज या पदावर पोहोचलो आहोत, आपलं प्रेम-सदिच्छा सदा आमच्या पाठीमागे असू द्या,' अशी अपेक्षा महमूद नवाज आणि सुहेल नाईक यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
