महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास नार्वेकरांची मंजुरी : विश्वनाथ चाकोते

shivrajya patra

वीरशैव महासभेच्या मुंबईतील मेळाव्यात घोषणा

वीरशैव लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी केंद्र शासनाकडं अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेची आग्रही मागणी  

सोलापूर : अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या विविध मागण्यांवर विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचं तैलचित्र लावण्यास मंजुरी दिल्याची माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी शनिवारी दुपारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. वीरशैव लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी केंद्र शासनाकडं अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा आग्रही असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. 

जगदगुरू श्री श्री श्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात 16, ऑगस्ट रोजी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबईस्थित यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री ईश्वर खंडरे यांच्यासह देशभरातील वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, असल्याचं अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष विश्वनाथ चाकोते यांनी प्रारंभी सांगितले.

महासभेच्या प्रमुख मागण्यांपैकी विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचं तैलचित्र लावण्याच्या मागणीस विधानसभा अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी मंजुरी दिली असल्याचे महासभेचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचं या पत्रकार परिषदेत शब्दसुमनांनी अभिनंदन केलं.


(मुंबईतील मेळाव्यात पार पडलेल्या पुरस्कार वितरणाचं छायाचित्र)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संमती देऊन लवकरच विधानसभेत महात्मा बसवेश्वर यांचे तैलचित्र लावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राज्य मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत सकारात्मकता दाखवून दिल्लीला या लवकरच चर्चा घडवून आणून निर्णय घेऊ, असं  सांगितले. 

त्याचबरोबर वीरशैव समाजातील वीरशैव कक्कय्या समाजाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, यांच्यासह कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील मंत्री, आमदार, खासदार माजी आमदार खासदार विविध पदाधिकारी यांचा वीरशैवश्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून वीरशैव बांधव उपस्थित होते. 

                     (पत्रकार परिषदेस माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचीही उपस्थिती)या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष कर्नाटक राज्याचे मंत्री ईश्वर खंडरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्षा उमा नाईक, मुंबई अध्यक्ष महेश मुद्दा, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष शंकर बीद्री, तेलंगणा अध्यक्ष नेती महेश्वर, तामिळनाडूचे अध्यक्ष एस नागराथीनम्, आंध्रप्रदेशचे अध्यक्ष दांडीना शिवानंद, केरळचे अध्यक्ष बीन के शंकर, महिला अध्यक्ष वीणा कश्यपनवर, उद्योग विभागाचे अध्यक्ष उमेश शिगोन, युवा अध्यक्ष व्यंकट रेड्डी-पाटील, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष विश्वशंकर चाकोते, रोहिणी कल्याणी, गुणवंत पाटील, गुरूपादप्पा पदशेट्टी, प्रकाश गवळी, प्रविण संगोलगी, सुरेश पाटील, सुभाषप्पा बोंदरे, चंद्रकांत नागणसुरे, अनिल चौगुले, शिवराज शेटकर आदींनी परिश्रम घेतले.

.........

... हे होते पुरस्काराचे मानकरी !

✨ केएलईचे कुलगुरू डॉ. प्रभाकर कोरे यांना वीरशैवरत्न, 

✨ बसव समितीचे अरविंद जत्ती यांना बसवरत्न, 

✨ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना वीरशैव भुषण, 

✨ बिदरचे माजी आमदार अशोक केनी यांना पंचाचार्य रत्न, 

✨ पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहिणीनाथ औसेकर महाराज यांना विठ्ठल सेवा पुरस्कार, 

✨ कलबुर्गीचे शरणबसवेश्वर विद्यावर्धक संघाच्या चेअर पर्सन डॉ. दाक्षायणी अव्वाजी यांना अक्कमहादेवी रत्न, 

✨ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांना वीरशैव आरोग्य दूत 

------

🔸मेळाव्यात 'या' होत्या प्रमुख मागण्या !

1️⃣ वीरशैव लिंगायत समाजाला सकल वीरशैव समाज असं यापुढे संबोधले जावे, 

2️⃣ महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र लावण्यात यावे, 

3️⃣ नवी मुंबई परिसरात वीरशैव समाजाला शासनाने 01 एकर जागा द्यावी, त्या जागेवर देशभरातून मुंबईत येणाऱ्या वीरशैव समाजाच्या मुलांसाठी तसेच मुंबईमध्ये येणाऱ्या समाज बांधवासाठी निवासाची सोय व्हावी, 

4️⃣ राज्याच्या मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व मिळावं, 

5️⃣ वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा.

.... 

समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा अन् वीरशैव लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी : चाकोते 

2013 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते, परंतु केंद्रात सरकार बदलले अन् ती मागणी प्रलंबित राहिली, वीरशैव लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता अशी आमची मागणी होती, असंही चाकोते यांनी यावेळी म्हटले.

*****
To Top