सोलापूर : जुळे सोलापुरातील अपार्टमेंटमधील मीटर खोलीतील वायरींचे बंडल चोरीच्या गुन्ह्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी एका चौकडीस गजाआड केले. गुन्ह्यात चोरीस गेलेल्या वायरींचे बंडल आणि गुन्हात वापरलेली रिक्षा असे एकूण 6, 75, 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तो गुन्हा घडकीस आणला.
जुळे सोलापुरातील केएलई शाळेजवळील द प्लॅटिनो अपार्टमेंटमधील ठेकेदाराकडं कामाच्या निमित्ताने येऊन एक दिवस काम करुन त्या ठिकाणी असलेल्या आर. आर. केबल कंपनीचे १.५ एमएमचे ४५ बंडल व आर.आर. केबल कंपनीचे ६ एमएमचे ०५ बंडल ईलेक्ट्रीक वायरची चोरी केल्याप्रकरणी या टोळीस जेरबंद करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
07 ऑगस्टच्या सकाळपूर्वी घडलेल्या घटनेसंबंधी मंगळवारी, 11 ऑगस्ट रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी डी.बी. पथकास सुचित केले होते. 
विजापूर नाका पोलीस स्टेशनकडील डी.बी. पथक प्रमुख स.पो.नि. गायकवाड आणि पथकातील पोलीस अमंलदार यांनी गुन्हा घटनास्थळावरील तसेच आसरा चौक, अमन चौक, नई जिंदगी परिसरातील 50 ते 60 सी.सी.टी.व्ही.फुटेज विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, तो आणि त्याचे अन्य 03 साथीदारांनी मिळून द प्लॅटिनो येथील केबल चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या माहितीच्या आधारे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या वायरींचे बंडल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असे एकूण 6, 75, 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन हा गुन्हा घडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-02) श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पो.नि. सुशांत वराळे (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख स.पो.नि. शीतलकुमार गायकवाड, स.फौ. आप्पा पवार, पो.ह. सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, पो. ना. शंकर भिसे, पो.कॉ. राजु पवार, पो.कॉ. समाधान मारकड, अमृत सुरवसे, पो.कॉ. राहुल विटकर, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगांव, स्वप्नील जाधव आणि पो.कॉ. श्रीरंग काशिद यांनी पार पाडली.
*
⏺️ ... ही आहेत आरोपींची नावं !
➡️ सर्फराज अ.वहाब पटवेघर (वय- 22 वर्षे, रा. प्लॉट नं. 15, साईनाथ नगर भाग 02, अमन चौक, सोलापूर)
➡️ अनिस उस्मान शेख (वय- 24 वर्षे, रा. 106, भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर.)
➡️ रेहान जमील शेख (वय- 20 वर्षे, रा. नागनाथ नगर, नई जिंदगी, सोलापूर.)
➡️ अमिन युन्नुस शेख (वय- 22 वर्षे, रा. इस्माईल बेकरीच्या बोळात, नई जिंदगी, सोलापूर.)
***
