सोलापूर : मंडप आणि डेकोरेशन क्षेत्रात सोलापूर शहराचं नाव उंचावणारे प्रसिद्ध व्यावसायिक, 'एस. एम. पाटील मंडप कॉन्ट्रॅक्टर' चे शिवकुमार सिद्रामप्पा पाटील यांना या वर्षीचा प्रतिष्ठित 'स्व. प्रल्हाद भाऊसो चव्हाण जीवनगौरव पुरस्कार 2026' जाहीर झाला. कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन आणि चव्हाण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जात असलेल्या पुरस्काराचं यंदाचं तिसरं वर्ष आहे.
कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन आणि चव्हाण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने, असोसिएशनचे संस्थापक स्व. प्रल्हाद भाऊसो चव्हाण यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जात आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष व माजी महापौर (कोल्हापूर) सागर प्रल्हाद चव्हाण, उपाध्यक्ष . तुकाराम पाटील, सेक्रेटरी सुनिल व्हनागडे, उपसेक्रेटरी मुसा शेख आणि विजय सुर्यवंशी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.
शिवकुमार पाटील यांनी मंडप व्यवसायात केलेले प्रदीर्घ व उत्कृष्ट कार्य, संघटनेच्या विविध कार्यातील सक्रिय सहभाग आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान यांची दखल घेऊन असोसिएशनतर्फे एकमुखाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
शुक्रवारी, 28 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापुरातील शाहू मैदान जवळील गोविंदराव टेंबे सभागृह येथे सायंकाळी 04 वा. होणार आहे.
शिवकुमार पाटील (एस. एम. मंडप कॉन्ट्रॅक्टर) यांच्या या यशामुळे सोलापूरच्या व्यावसायिक व सामाजिक वर्तुळात आनंदाचं वातावरण असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.
****
