सोलापूर : अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर आयोजित अस्तित्व महोत्सव 2026 मध्ये रंग साधक प्रमोद खांडेकर तीन दिवसीय नाट्यमहोत्सवास गुरुवारी सुरुवात झाली. प्रथम नाट्यमहोत्सवाची सुरुवात रंग साधक प्रमोद खांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच दीप प्रज्वलन करून झाली. 
याप्रसंगी उद्योगपती ज्योतिबा गुंड, मुख्य संयोजक अॅडवोकेट बसवराज सलगर, नाट्य महोत्सवचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, संजय सावंत, दादा साळुंखे, अस्तित्व मेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे, सचिन जगताप, अशपाक नदाफ, सागर देवकुळे, ओंकार साठे, नाट्यकर्मी आशुतोष नाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी आनंद जाधव लिखित तसेच किरण लोंढे दिग्दर्शित 'इश्क का पर्चा' या दोन अंकी नाटकाने झाली. अतिशय उत्तम मांडणी, अप्रतिम प्रकाशयोजना, कर्णमधुर संगीत तसेच कलावंतांनी केलेली धमाल, यामुळे या नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. 
प्रत्येक क्षणाला झालेल्या विनोदाने प्रेक्षकांना खेळून ठेवण्यात हे नाटक यशस्वी झाले याप्रसंगी कलावंताच्या कलेला टाळ्यांची दाद प्रत्येक क्षणाला मिळाली.
