सोलापूर ग्रामीण पोलीसांचा उपक्रम
सोलापूर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 112” या क्रमांकावर संपर्क साधून पोलीस, अग्निशमन किंवा रुग्णवाहिका सेवेची मदत मिळवावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासाठी डायल 112 (Emergency Response Support System - ERSS)" ही अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद सेवा राज्यभर कार्यान्वित करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फतही ही सेवा प्रभावीपणे काम करत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे आणि संकटाच्या प्रसंगी कमीत कमी वेळेत मदत पोहोचविणे, हा या यंत्रणेचा मुख्य उद्देश असल्याचं पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
📱डायल 112 म्हणजे काय ?
डायल 112" ही देशभरासाठी एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद सेवा असून, पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका या तिन्ही अत्यावश्यक सेवांचा लाभ एकाच क्रमांकावरून उपलब्ध करून देते. कोणत्याही मोबाईल किंवा लँडलाईनवरून 112 हा क्रमांक विनामूल्य डायल करता येतो.
📱डायल 112 द्वारे कोणत्या परिस्थितीत मदत मिळू शकते ?
✨ चोरी, दरोडा, घरफोडी किंवा संशयास्पद हालचाली.
✨ महिलांवरील अत्याचार, छेडछाड किंवा कौटुंबिक हिंसाचार.
✨ अपघात, जखमी व्यक्ती अथवा तातडीची वैद्यकीय मदत.
✨ भांडणे, मारामारी, कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता.
✨ नैसर्गिक आपत्ती, आग किंवा इतर आपत्कालीन घटना.
✨ हरवलेली व्यक्ती, वृद्ध नागरिक किंवा बालकांबाबत तातडीची मदत.
✨ इतर कोणतीही जीवित अथवा मालमत्तेला धोका निर्माण करणारी परिस्थिती.
📱डायल 112 सेवेची वैशिष्ट्ये :
➡️ 24 X 7 अखंड कार्यरत आपत्कालीन सेवा.
एका क्रमांकावरून विविध आपत्कालीन सेवांशी संपर्क.
➡️ कॉल प्राप्त होताच त्वरित नियंत्रण कक्षाकडून प्रतिसाद.
*****
