सोलापूर : आपखुशीने दुखापत, घातक शस्त्राच्या सहाय्याने मारहाण करुन दमदाटी, सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बुलंद इब्राहिम कुरेशी (वय-30 वर्षे) याला सोलापूर शहर आणि उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून 01 वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.
बुलंद कुरेशी याच्याविरुध्द सन 2018 व 2026 या कालावधीमध्ये आपखुशीने दुखापत करणे, घातक शस्त्राच्या सहाय्याने मारहाण करुन दमदाटी करणे, सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे, गोवंशीय जातीच्या जनावरांची निर्दयतेने, क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी कार्यवाही करुन बुलंद कुरेशी (रा. प्लॉट नं. 17, शास्त्री नगर, अन्सारी चौक, सोलापूर) यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून एक वर्षाकरीता तडीपार केलं आहे.
