सोलापूर / : मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी आणि त्यांच्याविषयी समाजात संवेदनशीलता निर्माण व्हावी, या उद्देशाने कृष्णा फाउंडेशनच्या वतीने चंडक पार्क, विजापूर रोड येथे वॉटर पॉट वितरण उपक्रम उत्साहात पार पडला.
कृष्णा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जानवी माखीजा, सहसचिव प्रशांत अपराध, राज माखीजा आणि दीपक आहुजा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये जनावरांसाठी पाण्याची भांडी (वॉटर पॉट) उपलब्ध करून देण्यात आली. वाढत्या उष्णतेमध्ये मुक्या जीवांना सहज पिण्याचे पाणी मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी फाउंडेशनचे सहसचिव प्रशांत अपराध उपस्थित होते. तसेच नीलम आहुजा आणि अवनी आहुजा यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले.
या उपक्रमांतर्गत वॉटर पॉटचे लाभार्थी पुढीलप्रमाणे आहेत:
1. गीता चीकमणी
2. मीना गुमटे
3. वृषाली गायकवाड
4. दीपक आहुजा
5. गंगाधर हुलसुरे
6. संतोष कटारे
7. सिद्धाराम बसर्गी
8. संतोष कानडे
9. शुभांगी कदम
या सर्व लाभार्थींमार्फत सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये जनावरांसाठी वॉटर पॉट बसविण्यात आले असून, अनेक मुक्या जीवांना त्याचा लाभ होणार आहे.
कृष्णा फाउंडेशनतर्फे भविष्यातही पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले.
