सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संपूर्ण राज्यभर संघटन मजबूत करण्याच्या तयारीत आहे. याचाच भाग म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. त्यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी गेल्या महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही, शिवसैनिकांत घोषणेची उत्सुकता असल्याचं दिसतंय. प्रकाश राठोड यांच्यावर लवकरच शिवसेनेची सोलापूर जिल्ह्यात मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मे महिन्यातील सोलापूर दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणुकीत अपेक्षित यश न मिळणे आणि अंतर्गत गटबाजीमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी गेल्या महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही, पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय.
- सुशिक्षित आणि निष्कलंक प्रतिमा
- तळागाळात काम करणारा कार्यकर्ता
- जातीय समीकरण - 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने
- पक्षवाढीसाठी कटिबद्धता आणि पक्षाच्या सूत्रांनुसार काम करणारा
- "80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण" या तत्त्वावर विश्वास ठेवणारा
- युवा आणि महिला वर्गाला सोबत घेऊन जाणारा नेता
या निकषांवर बारकाईने चाचपणी सुरू आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नियुक्त्यांना यावेळी विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
सोलापूरमध्ये चर्चा कोणाची ?
सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकारिणीबाबत शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. शहरप्रमुख, महानगरप्रमुख, दक्षिण सोलापूर जिल्हाप्रमुख, मध्य जिल्हाप्रमुख आणि उत्तर सोलापूर जिल्हाप्रमुख या सर्व पदांसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात प्रामुख्यानं प्रकाश राठोड यांचंही नाव आहे.
विशेषतः दक्षिण विधानसभा क्षेत्रात ग्रामीण आणि शहरी भागाचा मोठा विस्तार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात शिवसेनेची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्याचा फटका जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला बसला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्यक्रम न होणे, संघटनात्मक बांधणी न होणे आणि कार्यकारिणीची नियुक्ती न झाल्याने पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर तसेच शिवसैनिकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. हे चित्र बदलू पाहणारा एक आश्वस्त चेहरा म्हणून सध्या प्रकाश राठोड यांचं नाव आघाडीवर आहे.
1) प्रशासकीय अनुभव - प्रशासन क्षेत्रातील 21 वर्षांचा दांडगा अनुभव
2) सुशिक्षित आणि निष्कलंक चेहरा अशी प्रतिमा
3) तळागाळाशी संपर्क - विविध सामाजिक उपक्रमांद्वारे घराघरात पोहोच
4) संघटन कौशल्य - दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेची मोठी चळवळ उभी केली
5) ठाण्याचा अनुभव - स्व. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रभाव असलेल्या ठाणे शहरात 25 वर्षे वास्तव्यामुळे शिवसेना विचारधारेचा प्रभाव
6) सोशल मीडिया आणि जनसंवाद- डिजिटल माध्यमातून युवकांना पक्षाशी जोडण्याची क्षमता
या कारणांमुळे प्रकाश राठोड यांच्या जमेच्या महत्वपूर्ण बाबी म्हणून गणल्या जात आहेत.
जातीय समीकरणाचा फॅक्टर -
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात बंजारा समाजाची भूमिका निर्णायक आहे.
- दक्षिण सोलापूर : 52 बंजारा तांडे, सुमारे 01 लाख लोकसंख्या
- अक्कलकोट : 70 ते 80 बंजारा तांडे, सव्वा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या
- जिल्ह्यात एकूण : 02 लाखांपेक्षा जास्त बंजारा समाज
दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन्ही विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाने नेहमीच "किंगमेकर" ची भूमिका बजावली आहे. प्रकाश राठोड हे स्वतः दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट परिसराशी जोडलेले असून या दोन्ही विधानसभा कार्यक्षेत्रात बंजारा समाजात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
सोबतच, प्रकाश राठोड यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचे भव्य जनसंपर्क कार्यालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचे लोकार्पण होणार असून, या कार्यालयाच्या माध्यमातून लाखो नागरिकांना शिवसेनेशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. 
येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय पक्षवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रकाश राठोड यांच्यावर दक्षिण जिल्हा प्रमुख, सोलापूर शहरप्रमुख किंवा महानगरप्रमुख या पदांपैकी कोणत्याही एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा सर्वत्र आहे.
शिवसेनेची सोलापूरमधील नवीन कार्यकारिणी *"नवीन चेहरा + तळागाळाशी नाळ + सुशिक्षित-निष्कलंक प्रतिमा + योग्य समीकरण"* या चतुःसूत्रीवर आधारित असेल. आणि त्या दृष्टीने प्रकाश राठोड हे सर्वात योग्य नाव असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
आता सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारिणी कशी असेल आणि शिवसेनेची घोडदौड कोणत्या दिशेने असणार हे येणारा काळच ठरवेल, असं मानलं जातंय.
