सोलापूर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत कार्यरत रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन व क्लब असेंब्ली कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम रो. बसवराज बिराजदार (अध्यक्ष, 2026-27) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यालयाचं उद्घाटन रोटे. पारुल जे. पटेल (फर्स्ट लेडी आर.वाय. 2026-27 व आदिशक्ती लीडर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटे. वंदना कोपकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होत्या.
कार्यक्रमात क्लबच्या आगामी वर्षातील विविध सेवा प्रकल्प, सामाजिक उपक्रम, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील योजनांवर चर्चा करण्यात आली. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून क्लबच्या सेवा उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट' या ध्येयाला अधिक बळ मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रो. बसवराज बिराजदार, सचिव रो. संतोषकुमार सावळगी, खजिनदार रो. महेश साळुंके, उपाध्यक्ष रो. भारत कदम, रो. नागेश शेंडगे, रो. डॉ. अकबर नदाफ, रो. सत्यम दुधनकर, रो. डॉ. शिवगंगा मैंदर्गी, रो. मोहम्मद इक्बाल बागबान, रो. अनिल चंडक, रो. योगीनाथ कुडते, रो. स्वाती मनसावाले, रो. सलीम जमादार, रो. विशाल कोंटम, रो. तौफिक काझी आणि रो. समीर नदाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. डॉ. शिवगंगा मैंदर्गी आणि आभार सचिव रोटे. संतोषकुमार सावळगी यांनी केले.
