सोलापूर : स्वर्गीय मोहम्मद रफी व स्व. मोहम्मद अजीज यांच्या 46 व्या स्मृतिदिनानिमित्त सरगम स्टुडिओतर्फे 'यादों की महफिल' ऑकेस्ट्रा कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरुवारी, 30 जुलै रोजी सायंकाळी ठिक 07:00 वाजता येथील हुतात्मा स्मृति मंदिरात हा कार्यक्रम होत असून प्रवेश सर्वांसाठी खुला (विना मूल्य) असल्याचं संयोजक आरीफ एलाल यांनी सांगितलं आहे.
या कार्यक्रमात स्वर्गीय मोहम्मद रफी आणि स्वर्गीय मोहम्मद अजीज यांनी गायलेले सदाबहार गीतं सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन आरीफ एलाल व मॅनेजमेंट बब्बी हुमनाबादकर यांनी केलं आहे.
या कार्यक्रमात गायक म्हणून आरीफ एलाल, ऐजाज खलीफा, अनिता अय्यर, लता राज, वर्षा घोडके, इम्रान अली, मुस्तकीम एलाल, बाबर कोरबो, राजकुमार कोकलकी आणि अशोक मैंदर्गी सहभागी असणार आहेत. 
ह्या कार्यक्रमात करावोके ट्रॅकवर गाणे सादर करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुधिर खरटमल व नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे हे उपस्थित राहणार आहे. तरी सर्व रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असं आवाहन आयोजक आरीफ एलाल यांनी केलं आहे.
****
