रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे कासेगांव येथे वृक्षारोपण

shivrajya patra

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट ऑर्किड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, 26 जुलै रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेत वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली.

पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीसाठी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचं सहकार्य लाभले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रोटेरियन बसवराज आर. बिराजदार, सचिव रोटेरियन संतोषकुमार सावळगी, प्रकल्प प्रमुख रोटेरियन योगिनाथ कुडते, सहायक प्रांतपाल रोटेरियन महेश साळुंके, रोटेरियन गणेश लिंगशेट्टी, रोटेरियन दीपक भोगे तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट ऑर्किड कॉलेजच्या अध्यक्षा समृद्धी गवळी, सचिव श्रावणी बिराजदार, त्यांचे पदाधिकारी व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, जलसमृद्धी उद्योगाचे उद्योजक दत्ता डांगे (उळेगांव) आणि त्यांचे सहकारी, माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि त्यांचे चिरंजीव अमित पाटील व सुमित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

“वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा आणि भावी पिढीसाठी हरित भविष्य घडवा” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. "सर्व्हिस अबाव सेल्फ" या रोटरीच्या सेवाभावी विचाराला अनुसरून हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

***** 

To Top