सोलापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य काळे आणि जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मंगळवारी, 28 जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी आयोगाला भेटून भारतीय काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष मुस्ताक लालकोट यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक समाजाच्या जात पडताळणीसंदर्भातील समस्यांचं निवेदन दिले. 
सोलापूर जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजातील लोकांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही किंवा त्यांना विनाकारण अडवले जात आहे. आयोगाने यासंबंधी दखल घ्यावी, अशा आशयाचं विनंतीचं पत्र त्यांना देण्यात आले. 
अल्पसंख्य समाजातील लोकांच्या समस्यांचं वेळेत निराकरण करण्यात यावं, असे आदेश आयोगाच्या सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

