सोलापूर : राज्य शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातंर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी, 31 जुलै रोजी सकाळी विशेष शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
हे विशेष शिबिर कासेगांव पंचक्रोशीतील नागरिकांसाठी विविध महसुली व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलं आहे. शुक्रवारी, सकाळी 09 ते सायं. 05 वा. दरम्यान जिल्हा परिषद शाळेत होत आहे.
या शिबिरामध्ये 7/12 व 8अ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल 7/12 व 8 अ वाटप, तुकडेबंदी नियमितीकरण, जमीन वर्ग 01 प्रकरणे,भूधारणा/कर्ज प्रकरणे, उत्पन्न, जात, रहिवासी दाखले, संजय गांधी व इंदिरा गांधी योजना ई-मोजणी, पी. एम. किसान आणि अन्य तक्रार निवारणासाठी आयोजित करण्यात आलं आहे.
सर्व शेतकरी व नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषद बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी केलं आहे.
